शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत जीव धोक्यात घालून पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:11 IST

नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत.

ठळक मुद्देमनपाकडून परिचारिकांना सुरक्षेची साधने उपलब्ध नाहीतआरोग्य विभागात नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गामुळे खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्गाची लागण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही नागपूर शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना कुठल्याही स्वरूपाची सुरक्षा साधने महापालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून तपासणी करावी लागत आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात संसर्गित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या जवळ गेली आहे. तर मृत रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. दुसरीकडे यात दररोज तीनशेहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेयो, मेडिकल रुग्णालयावरील भार वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संसर्गित रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात आहे. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी परिचारिका त्यांच्या घरी जात आहेत. परंतु त्यांना महापालिकेने सुरक्षा किट उपलब्ध केलेली नाही. रबरी हॅण्डग्लोव्हज, एन-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध केले नसल्याने संसर्गाचा धोका असल्याने परिचारिका दहशतीत काम करत आहेत.मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापरमहापालिकेच्या आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या परिचारिकांना रबरी हॅण्ड ग्लोव्हज उपलब्ध केले नसल्याने मेहंदी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॅण्ड ग्लोव्हजचा वापर या परिचारिका करीत आहेत. असे करणे धोकादायक आहे.रिक्त जागा असूनही संधी का नाही?महापालिकेत आरोग्य विभागातील पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत. यात तीनशेहून अधिक परिचारिकांची पदे आहेत. दुसरीकडे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून २५० कंत्राटी परिचारिका काम करतात. त्यांना कायम का केले जात नाही, हा संशोधनाचा विषय आहे. परिणामी त्यांना आठ ते दहा हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनात कोरोना कालावधीत जोखमीचे काम करावे लागत आहे.आरोग्य विभागात नियोजनाचा अभावमहापालिकेच्या आरोग्य विभागात नियोजन व समन्वयाचा अभाव आहे. कर्मचारी व अधिकारी यांना मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी वेळोवेळी काम पडते. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही यामुळे वेळीच उपाययोजना करता येत नाहीत. काम करताना अडचणी येतात, अशी माहिती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस