शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 22:43 IST

जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअनेक शिक्षकांना कोरोनासंबंधित कामाला लावण्यात आले आहे. नवीन निर्देशांप्रमाणे त्या शिक्षकांनादेखील महाविद्यालयांत रुजू व्हावे लागणार आहे. मात्र त्याच्यासंदर्भात स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना या निर्देशांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजी नवा शासन निर्णय जाहीर केला. विद्यापीठे आणि कॉलेजेस येथे शंभर टक्के उपस्थिती राखली जावी असे आदेशांमध्ये म्हटले आहे. १ ते ३१ ऑक्टोबर या काळात अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असून नोव्हेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचारी यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे. शासनाचा आदेश पाहता महाविद्यालयांनी घरुन ऑनलाईन काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित रुजू होणाच्या सूचना दिल्या आहेत.यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. अशा स्थितीत मूल्यांकनाचेदेखील काम जास्त राहणार नाही. अशा स्थितीत सर्व वर्षांना शिकविणाºया शिक्षकांना बोलविण्याची काहीच गरज नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.कोरोना झाला तर जबाबदार कोणअनेक संलग्नित महाविद्यालयांत शिक्षकांना एकाच ठिकाणी दाटीवाटीने बसावे लागते. सध्या शिक्षकांना आळीपाळीने बोलविण्यात येत आहे. मात्र सर्वांना एकत्रित बोलविले तर फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत शिक्षकांना कोरोना झाला तर त्याचा जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.अध्यापन तर नियमित सुरूचकोरोना काळात अध्यापन नियमित सुरू असून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग होत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम मागे राहण्याची शक्यता नाही. विशेषत- अभियांत्रिकी महाविद्यालयांत तर आॅनलाईन सरावावर जास्त भर दिला जात आहे. अशा स्थितीत अंतिम वर्षाच्या निकालासाठी सर्व शिक्षकांना कामावर बोलविणे हा अन्यायच असल्याची शिक्षकांमध्ये भावना आहे.वेतनाचे काय करणारसद्यस्थितीत बहुतांश खासगी महाविद्यालयांत शिक्षकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. जर शिक्षकांना १०० टक्के प्रमाणात दररोज बोलविले, तर त्यांना पूर्ण वेतन देणार का असा सवालदेखील शिक्षकांनी उपस्थित केला आहे.शिक्षक संघटनांकडून मौनकोरोना काळात शिक्षकांना १०० टक्के बोलविण्याच्या निर्णयावरुन शिक्षकांमध्ये रोष आहे. मात्र शिक्षक संघटनांनी मात्र यासंदर्भात मौन बाळगले आहे. या संघटनांच्या भूमिकेवर शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

टॅग्स :onlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र