शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ ला होणारी परीक्षा घेताहेत २०१९ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 22:33 IST

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आता पाच वर्षानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षार्थींना पाठविले आहे. येत्या ३ ऑगस्टला सदर पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी गोंधळले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था : परीक्षार्थींकडून आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था(नीरी)द्वारे टायपिंग स्टेनो या पदासाठी २०१५ मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षार्थींची निवडही करण्यात आली होती. तेव्हापासून त्या परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती संस्थेने दिली नाही. आता पाच वर्षानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षार्थींना पाठविले आहे. येत्या ३ ऑगस्टला सदर पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी गोंधळले आहेत.नीरीसारख्या नामांकित संस्थेकडून परीक्षेचे आयोजन भोंगळ पद्धतीने होत असल्याचा आक्षेप परीक्षार्थींनी घेतला आहे. संस्थेने २०१५ मध्ये स्टेनो या पदासाठी जाहिरात दिली होती. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं नीरीकडे जमा केली होती. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर २३ जणांची परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यांची यादीसुद्धा संस्थेने प्रसिद्ध केली होती. पण परीक्षा कधी होईल, यासंदर्भात कुठलीही माहिती दिली नव्हती. निवड झालेल्या काही परीक्षार्थींनी तेव्हा परीक्षेच्या आयोजनासंदर्भात संस्थेकडे माहितीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी याकडे गांभीर्याने घेतले नाही. ते विसरूनही गेले होते. त्यांच्याजवळ परीक्षेसंदर्भातील कागदपत्रेही गहाळ झाली आहेत. पण येत्या १२ जुलै २०१९ रोजी नीरीने विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र पाठविले. त्यानुसार येत्या ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातील काही परीक्षार्थींचे वय निघून गेले आहे. काही परीक्षार्थींची प्रॅक्टिस सुटलेली आहे. अचानक ध्यानीमनी नसताना परीक्षेचे प्रवेशपत्र आल्यामुळे मिळालेला अवधी अतिशय कमी असल्याने किमान परीक्षा एक ते दीड महिन्यानंतर घेण्यात यावी, अशी परीक्षार्थींची मागणी आहे.

 

टॅग्स :examपरीक्षाtypewriterटाइपरायटर