शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:16 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक ...

ठळक मुद्देनागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केले प्रात्यक्षिक जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर होणार प्रात्यक्षिक

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या लोकसभा निवडणुकीत नागपुरात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची संपूर्ण तपासणी झाली असून या मशीन निवडणुकीसाठी सज्ज आहेत. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वत: पत्रपरिषदेत मशीन कशी काम करते याचे प्रात्यक्षिक दाखविले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, अत्याधुनिक, नवीन ईव्हीएम मशीन जिल्ह्याला मिळाल्या आहेत. ९,४३६ बॅलेट तर ५,४८६ कंट्रोल युनिट आहेत. आणि ५,४८६ व्हीव्हीपॅट मशीन मिळाल्या आहेत. या मशीन शासनाची कंपनी असलेल्या बी.ई.एल. आणि ई.सी.आय.एल. कंपनीकडून तयार करण्यात आल्या आहे. या ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी कळमना येथे झाली. तपासणीत ८९ बॅलेट युनिट, १२७ कंट्रोल युनिट तर ३७५ व्हीव्हीपॅट मशीन खराब निघाल्या. त्या बी.ई.एल. आणि ई.सी.आय.एल कंपनीला परत करण्यात आल्या. या व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनच्या तपासणीकरता सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. तपासणीच्या वेळी एकाही लोकप्रतिनिधीकडून विरोध दर्शविण्यात आला नाही किंवा आक्षेप घेण्यात आला नसल्याचे मुद्गल यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतदान झालेल्या व्यक्ती नाव, पक्षाचे चिन्ह आणि मतदान ओळख पत्रातील क्रमांक स्लीपमध्ये दिसेल. ही स्लीप सात सेकंद राहील. त्यानंतर स्लीप व्हीव्हीपॅट मशीनला असलेल्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा होईल. त्यानंतर मात्र मतदाराला ती पाहता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.आक्षेप घेता येईलमतदार करताना व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लीपमध्ये दुसºयाच उमेदवाराचे, चिन्ह दिसल्यास किंवा तसे वाटल्यास किंवा स्लीप न दिसल्यास मतदाराला संबंधित केंद्र प्रमुखाकडे फार्म १७ ए भरून आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर केंद्र प्रमुख टेस्ट मतदान घेईल. त्यात मतदाराने केलेले आक्षेप खरे आढळून आल्यास ते मशीन बाद केले जाईल.प्रत्येक विधानसभेतील एक मतदानकेंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणीप्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील मत, मतदार यादीतील नोंद आणि व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणी होणार आहे. यात तफावत आढळ्यास संबंधित ठिकाणी नव्याने मतदान होईल.कोट...इव्हीम मशीन कॅल्कुलेटरप्रमाणे आहे. त्याचा कोणत्याही इतर वस्तूशी संबंध येत नाही. त्यामुळे त्याला हॅक करणे किंवा दुरुन हाताळणे शक्य नाही. नवीन मशीन अतिशय सुरक्षित आहे.अश्विन मुदगलजिल्हाधिकारीजनजागृती मोहिमेचा शुभारंभइव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत निवडणूक विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला असून हा रथ संपूण जिल्ह्यात फिरणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार क्षेत्रात हा रथ जाणार आहे. ४१ दिवस या रथाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यात येत आहे. तसेच व्हीव्हीपॅटबाबतही माहिती देण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी माहिती फलके लावण्यात आली आहे. निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन व त्यावर केलेले मतदान अधिक विश्वासार्ह होण्यासाठी या मशीनसोबतच व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्षात कसे काम करते, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४३८२ मतदान केंद्र आहे. या सर्व मतदान केंद्रावरही याच्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिके करण्यात येतील.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उप जिल्हाधिकारी व्ही.बी. जोशी, ज्ञानेश भट, जगदीश कातकर, नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयVVPATव्हीव्हीपीएटी