शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:18 IST

ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत?

ठळक मुद्देव्ही.एल. मातंग : बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्य अधिवेशनात टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले नाहीत? त्याच्या अधिकारासाठी कोण लढले, हे त्याला चांगल्या पद्धतीने कळेल आणि आजवर आपल्याला धर्माच्या नावावर अंधपणे मत देत असलेला ओबीसी समाज उद्या मत देणार नाही. अशावेळी आपण सत्तेवर कसे येणार? या भीतीमुळेच सत्ताधाºयांनी इव्हीएम मशीन देशात आणली. इव्हीएम मशीन म्हणजे मताचा मिळालेला अधिकार हिरावणारी मशीन असून, या माध्यमातून लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र देशात सुरू आहे, अशी जाहीर टीका बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल. मातंग यांनी येथे केली.बहुजन मुक्ती पार्टीचे दुसरे राज्य अधिवेशन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने हे उद्घाटक होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब मिसाळ पाटील, विजय वाघचौरे, शिवाजी नाना पाटील, अनिलकुमार माने, प्रताप पाटील, आझाद लोंढे, रामनिवास गुप्ता, नंदा लोखंडे, यू.पी. राठोड, विजय राजूरकर, अ‍ॅड. अनिल किनाके व्यासपीठावर होते. व्ही. एल. मातंग म्हणाले, या देशात इव्हीएम मशीन आणण्याचे पाप हे काँग्रेसनेच केले आहे. त्यामुळे काँग्रेस इव्हीएमच्या विरोधात कधीच आवाज उचलताना दिसत नाही. भाजपाने या मशीनचा व्यापक वापर करून सत्ता स्थापित केली आहे. सध्याच्या सत्ताधाºयांनी इव्हीएमद्वारे मताचा अधिकारी हिरावला आहे, भूमी अधिग्रहणातून जमिनीचा अधिकार हिरावला आहे आणि नोटाबंदीद्वारे आता संपत्तीचाही अधिकार हिरावला आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संचालन महादेव जमदाडे यांनी केले. गणेश चौधरी यांनी आभार मानले.बहुजन समाजाने एकत्र यावे - लक्ष्मण मानेसरकारच्या जमिनी लुटण्याचा धंदा आजही सुरू आहे. सर्वच समाज त्रस्त आहे. तेव्हा बहुजन समाजाने एकत्र येऊन जनआंदोलन उभारावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केले. जात-पोटजात विसरा, आंतरजातीय विवाह करा, असे आवाहन त्यांनी केले. पँथरपासून आपली सुरुवात झाली. आता बुद्धाकडे आलो आहे. आरएसएसला संपवण्यासाठी लढत राहणार, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.