शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:15 IST

नागपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर अमरावती तालुक्यातील फुबगावांत लोहयुगातील वस्ती सापडली आहे.

ठळक मुद्देभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लावला शोध

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर अमरावती तालुक्यातील फुबगावांत लोहयुगातील वस्ती सापडली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या खोदकामात हा खुलासा झाला आहे.३ ते ४ हजार वर्षापूर्वीचे लोहयुगातील पुरावशेष शोधण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची उत्खनन शाखेची चमू दोन आठवड्यापूर्वी अमरावती तालुक्यातील फुबगांव येथील पूर्णा नदीच्या काठावर उत्खनन करीत होती. उत्खननात त्यांना जमिनीखाली त्या काळातील घरांची फर्शी सापडली. त्याचबरोबर आभूषणाचे अवशेष, मौल्यवान दगडाद्वारे बनविण्यात आलेल्या वस्तू मिळाल्या. सोबतच लोहयुगातील भांडी, शस्त्र व भांडी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साचे मिळाले. त्यावेळेच्या मुद्रेचे संकेतही मिळाले आहे.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या २० सदस्यांद्वारे हे संशोधन होत आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सुद्धा या परिसरात विभागाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यात फुबगावमध्ये कृष्ण लोह काळ्या व लाल रंगाचे भांडे, मातीचे माठ मिळाले होते. याच आधारावर या परिसरात विभागाने उत्खननाचा निर्णय घेतला.

टुरिस्ट स्पॉट बनू शकतोया उत्खननासंदर्भात विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक खुलासे केले नाही. पण या भागात लोहयुगीन संस्कृती व अधिवासासंदर्भात अवशेष व पुरावशेष मोठ्या प्रमाणात सापडल्यास हा परिसरात सुरक्षित केल्या जाऊ शकतो. असे झाल्यास हा परिसर पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित होऊ शकतो. तसेच आॅर्कियोलॉजी क्षेत्रात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व शोधकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थळ होऊ शकते.

फुबगावात मॅपिंग केल्यानंतर सर्वे व लॅण्डस्केपींग करण्यात आले. यानंतर २० बाय २० मीटर च्या दोन ट्रेंटमध्ये खोदकाम सुरू केले. यात लोहयुगात बनलेल्या एका घराची फर्शी मिळाली. त्याचबरोबर धान्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बनविण्यात आलेले भांडार, गळ्यात घालण्यात येत असलेली माळ सापडली आहे. पुढे आश्यकतेनुसार पुन्हा खोदकाम करण्यात येऊ शकते. खोदकामासोबतच विस्तृत अहवाल तयार करण्यात येत आहे.डॉ. प्रशांत सोनोने,सहा. आर्कियोलॉजिस्ट,भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

महत्त्वपूर्ण स्थळ आहेपूर्णा नदीच्या काठी १९८५ नंतर पहिल्यांदा उत्खनन करण्यात आले आहे. आता केवळ खोदकामाला सुरुवात झाली आहे. यात लोहयुगीन अधिवासाचे संकेत मिळाले आहे. लोहयुगातील संस्कृतीची माहिती मिळविण्यासाठी हे खूप महत्वाचे स्थळ आहे.डॉ. निखिल दास,संचालक, उत्खनन शाखा

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण