शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कोविशिल्ड लस दिलेल्या सर्वांची प्रकृती उत्तम : मेडिकलमध्ये मानवी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:38 IST

vaccinated with Covishield, good health, Nagpur news कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. या मानवी चाचणीला आज एक आठवडा झाला. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये २० महिला व ३० पुरुषांचा सहभाग आहे.

ठळक मुद्दे२० महिला, ३० पुरुषांंचा सहभाग

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. या मानवी चाचणीला आज एक आठवडा झाला. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये २० महिला व ३० पुरुषांचा सहभाग आहे.

‘भारतात पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘ कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या महिन्यात नागपूर मेडिकलला या चाचणीची परवानगी मिळाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात या चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीसाठी सुमारे २००वर स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. यातील १८ ते ७० वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांची निवड करून त्यांची कोविड व रक्ताची तपासणीसाठी करण्यात आली. यात सामान्य अहवाल आलेल्या ५० लोकांची निवड करून पहिला डोज देण्यात आला. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्यांमध्ये २० महिला, ६० वर्षांवरील पाच ज्येष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.

‘लोकमत’शी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, पहिला डोज दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोज २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृतीविषयी चौकशी केली जाईल आणि १८०व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये रक्ताची तपासणी केली जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय