शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

'धर्मांतरांची व्यवस्था नीट ठेवा' बाबासाहेबांचे पत्र दाखवताच सर्वच अवाक् झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 07:00 IST

Dr Babasaheb Ambedkar Nagpur News कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते.

ठळक मुद्देधम्मक्रांतीच्या दोन दिवसांपूर्वी झाली उंटखान्यात सभा बाबू हरिदास आवळे बाबासाहेबांच्याप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीच्या दोन दिवसाआधी शहरातील उंटखाना वस्तीतील महानगरपालिकेच्या शाळेत ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची धर्मांतराच्या विषयावर सभा झाली. या सभेत दादासाहेब गायकवाड यांनी धर्मांतराचा कार्यक्रम सार्वत्रिक निवडणुकानंतर करावा यावर जोर दिला. परंतु सभेत उपस्थित अ‍ॅड. हरिदास बाबू आवळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दर्शविला. 'धर्मांतराची व्यवस्था नीट ठेवा' या आशयाचे बाबासाहेबांनी १५ दिवसांपूर्वी लिहिलेले पत्र खिशातून काढून दाखविताच सर्वच अवाक झाले. धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पाडणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. निवडणुका येतील आणि जातील पुढे पाहू, धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणारच, असे ठासून सांगत, कार्यकर्त्यांचे मन वळविले.कर्मवीर बाबू हरिदास आवळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. १ जुलै १९१६ रोजी कामठी छावणी येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण रायपूर व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झालेले बाबू हरिदास आवळे यांनी विज्ञान व कायद्याची पदवी घेतली. विद्यार्थिदशेपासूनच ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. येथूनच ते बाबासाहेबांच्या जवळ पोहचले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून अनुशासनप्रिय कार्यकर्ता म्हणून ते लोकप्रिय होते. डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मध्यप्रदेश शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे ते सरचिटणीस होते. मध्य प्रदेशातील हजारो अस्पृश्यांनी धम्मदीक्षेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी पत्रक काढून आवाहन केले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतराच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिवार्णानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर १३ एप्रिल, १९५७ रोजी रातोरात कमळाच्या फुलात उभी असलेली तथागत गौतम बुद्ध यांच्या मूतीर्ची स्थापना केली. ती मूर्ती कुणी बसविली, अशी चौकशी पोलिसांनी केल्यानंतर कुणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वत: आवळेबाबूंनी पुढे येत जबाबदारी स्वीकारली व स्वत:वर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करून घेतला.दीक्षाभूमीची १४ एकर जागा मिळवून दिलीआवळे बाबू महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते. विधान परिषदेत अशासकीय ठराव आणून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बौद्धांच्या धार्मिक कायार्साठी चौदा एकर जागा मिळवून दिली. दीक्षाभूमी मिळविण्याचे श्रेयही आवळे बाबू यांनाच जाते. बाबासाहेबांच्या पश्चात संघटनांचा भार वहन करण्यासाटी गठित करण्यात आलेल्या प्रेसिडियमचे ते सेक्रेटरी होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ते उपाध्यक्ष होते. त्यांना ऑल इंडिया समता सैनिक दलाचे अध्यक्ष म्हणूनही निवडण्यात आले.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी