शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अन् अख्खे रनाळा गाव हळहळले!

By admin | Updated: January 25, 2017 02:54 IST

यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात

तिघांवर सामूहिक अंत्यसंस्कार : एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश कामठी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील जेतवन बुद्धविहाराजवळ (जिल्हा यवतमाळ) सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात कामठी तालुक्यातील रनाळा येथील तिघे व नेरी येथील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रनाळा येथील तिघांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात सामूहिक अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अख्खे गाव स्तब्ध होते. सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. शांताराम माधवराव नवले (४५), लताबाई शांताराम नवले (४०), सरस्वती सूर्यभान नवले (५५) तिघेही रा. रनाळा, ता. कामठी व नेरी येथील अमित शेषराव वंजारी (२५) अशी मृतांची नावे आहेत. यांच्यासह नागपूरचे तिघेजण एमएच-४०/केआर-२४२२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओने रनाळ्याहून उमरखेड तालुक्यात जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यात सातही जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रनाळा येथील काही नागरिकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्व जखमींसह मृतांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता उत्तरीय तपासणी तत्काळ करण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारात मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. तिघांचेही मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रनाळा येथे आणण्यात आले. मृतदेहाच्या प्रतीक्षेत प्रत्येकाने रात्र जागून काढली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गावातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. प्रत्येक मन हळहळत होते. गावातील प्रत्येक व्यक्ती गावातच हजर होती. या घटनेमुळे नवले कुटुंबीयांवर संकटाचा जणू डोंगर कोसळला. अंत्ययात्रेत माजी आ. देवराव रडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्या सरिता रंगारी, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र गवते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, उपसभापती प्रमोद महल्ले, अनिल निधान, भिलगावचे सरपंच मोहन माकडे, येरखेड्याचे सरपंच मनीष कारेमोरे यांच्यासह लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी) शांतारामची सामाजिक बांधिलकी रनाळा येथे स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त स्मशानभूमीत दहनशेड तयार करण्यासाठी शांताराम नवले यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी अनेक दिवस संघर्षही केला. त्यांच्याच पुढाकाराने या स्मशानभूमीत शेड तयार करण्यात आले. याच शेडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करीत रनाळावासीयांना अखेरचा निरोप द्यावा लागतो. थरथरत्या हातांनी त्यांचे सरण रचण्यात आले. त्यांच्यापूर्वी या गावातील यमुनाबाई डहाके यांच्या पार्थिवावर या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ते चांगल्या तऱ्हेने सरण रचायचे. गावातील बहुतांश अंत्यसंस्काराचे सरण त्यांनी रचत एक वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासली होती. मुलांचे छत्र हरपले शांताराम नवले यांना तीन मुले आहेत. मोठा शुभम (२१) हा पांजरा (कोराडी) येथील महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षाला आहे. मधला सौरभ (१९) हा कामठी येथे पॉलिटेक्निक करीत असून, लहान कुणाल (१६) हा कामठीतील नूतन सरस्वती विद्यालयात १० व्या वर्गात शिकत आहे. काळाने अपघातात या तिघांचेही आई-वडील हिरावून घेतल्याने त्यांचे छत्र हरपले. भजनाच्या व्यासंगी सरस्वतीबाई या आपघातात सरस्वतीबाई सूर्यभान नवले यांचाही मृत्यू झाला. त्या भजनाच्या व्यासंगी होत्या. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन गावात महिला भजन मंडळाची स्थापना केली. गावातील अनेक महिलांना या भजन मंडळात सामावून घेतले होते. त्यांना तीन विवाहित मुली व एक मुलगा आहे. सूर्यभान नवले हे शांताराम यांचे मोठे बंधू होत. त्यांनी रनाळ्याचे सरपंचपदही भूषविले. शांताराम यांना चार भाऊ असून, ते धाकटे होत. सीताराम हे त्यांचा दुसऱ्या व गजानन तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ होय. सीताराम हे महावितरणमध्ये तर गजानन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते.