शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

प्रत्येक गावठाणाची होणार ड्रोनद्वारे मोजणी : गावकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:23 PM

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपली हद्द सुद्धा माहीत नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून, ड्रोनद्वारे हे मोजमाप होणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीला कळणार आपली हद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी झाली नव्हती. त्यामुळे ग्रामपंचायतीला आपली हद्द सुद्धा माहीत नव्हती. शासनाने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून, ड्रोनद्वारे हे मोजमाप होणार आहे. गावठाण मोजणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गावातील प्रत्येक घरमालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्डही दिले जाणार असून, या योजनेत सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अभिलेख शासकीय स्तरावर तयार केले जाणार आहे.भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने ही प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू आहे. यामध्ये प्रत्येक गावाची गावठाणची जागा मोजली जाणार असून नंतर ड्रोन कॅमेऱ्याने प्रत्येक घर व शासनाची जागा मोजली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात ७६८ ग्राम पंचायतीअंतर्गत सुमारे १५०० वर गावे आहेत. गावठाण हद्द निश्चित करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व सरपंच त्यांच्या मदतीला असणार आहे. या मोजणीमध्ये गावातील अंतर्गत रस्ते, घर तसेच मोकळ्या जागेचे नकाशे तयार केले जाणार आहेत. तसेच प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना दिले जाणार आहे.गावाची संपुर्ण माहिती मिळेलग्रामपंचायतीकडे गावठाणांचे अभिलेख उपलब्ध नसल्याने आपली नेमकी किती जागा आहे, याची माहिती ग्रा.पं.ला नाही. मालमत्तांचे मालकीपत्र नसल्यानेही ग्रामस्थांना यामध्ये गृहकर्ज, बँक तारण किंवा कर्ज मिळत नाही. गावठाण मोजणी नंतर प्रत्येक गावातील नदी-ओढे, शेत, रस्ते यांचीही माहिती मिळणार आहे. इंग्रजांच्या काळापासून मोजणी झालेली नाही.ग्रा.पं.चे उत्पन्न वाढण्यास मदतप्रत्येक ग्रामपंचायतला मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात कराच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. कारण आतापर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मिळकती व मालमत्तांची गणना झालेली नाही. तसेच या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार राज्य सरकारकडून देण्यात आले. परंतु अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशेच उपलब्ध नाहीत. आता मात्र गावठाणांचे भूमापन झाल्यानंतर सर्व माहिती ग्रामपंचायतींना मिळणार असून ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत