शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ सांभाळणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST

नागपूर : आजवर राजकीय फायद्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा वापर झाला. प्रत्यक्षात पदवीधरांचे प्रश्न मांडले गेले नाही. यावेळी परिवर्तन घडवून राजकीय ...

नागपूर : आजवर राजकीय फायद्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा वापर झाला. प्रत्यक्षात पदवीधरांचे प्रश्न मांडले गेले नाही. यावेळी परिवर्तन घडवून राजकीय लाभ थांबविण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीतर्फे प्रश्नांची जाण असलेले ॲड. अभिजित वंजारी रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता बूथवर उपस्थित राहून काम करेल, असा विश्वास राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते खासदार प्रफुल्‍ल पटेल यांनी व्यक्त केला.

गोंदिया येथील वैभव लॉन आयोजित सभेत ॲड. अभिजित वंजारी यांच्‍या प्रचाराचा समारोप झाला. सभेला विधानसभा अध्‍यक्ष नाना पटोले, आ. सहसराम कोरोटे उपस्‍थित होते. यावेळी प्रफुल्‍ल पटेल यांनी ॲड. वंजारी यांच्‍या समर्थनार्थ विदर्भातील सर्व संघटना आणि नेते एकत्र आल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. ते म्हणाले, युवा उमेदवारामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे. वंजारी यांचा थेट मतदारांशी संपर्क आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढेल व त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षक समन्वय समितीची बैठक

-महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्य.स्तर) आयइडीएसएस या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुआ, आ. विकास ठाकरे संघटनेचे अध्यक्ष विनोद नाकाडे, सचिव सतीश वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे , गिरीश पांडव आदी उपस्थित होते.

मंत्री, अध्यक्षांनी घेतली बैठक

- ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी बैठक घेत नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, काँग्रेसच्या विविध आघाड्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पदवीधर मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

ॲड. वंजारी यांचा युवाशक्‍तीशी लाईव्‍ह संवाद

- ॲड. अभिजित वंजारी यांनी रविवारी फेसबुक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातून युवाशक्‍तीशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी पदवीधरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व स्वत:चे व्हिजन मांडले.