शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यास विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:56 IST

मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : १०२० कोटीचा शासनास प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात बांधण्यात आलेल्या धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा पाणीसाठा वाढविण्यासाठी १०२० कोटीचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून सिंचनासाठी पेंच प्रकल्प परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांना विहीर बांधून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी व कर्ज वाटपावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत २०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून तालुका स्तरावर शिबिर लावण्यात येत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव आरबीआयकडे पाठविण्यात येईल. तसेच त्या बँकेतून शासकीय ठेवीही काढून घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अन्नधान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, लीलाधर वार्डेकर उपस्थित होते.साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभपालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा अभियानांतर्गत २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ देण्यात येते. या लाभासाठी शहरी भागात ५० हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी ४४ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे. जुन्या निकषामुळे जिल्ह्यात १ लाख ६१ हजार २० कार्डधारक लाभ घेण्यास अपात्र ठरले होते. मात्र आता नवीन निकषामुळे जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख कार्डधारकांना म्हणजेच जवळपास साडेआठ लाख नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळेल. यासाठी त्यांना फक्त हमी व वार्षिक उत्पन्न निकषात असल्याची माहिती द्यायची आहे.एनआयटी बरखास्तीची कारणे न्यायालयास सांगूशहरात एकच विकास संस्था हवी, या मताचे शासन आहे. त्यामुळेच एनआयटी (नागपूर सुधार प्रन्यास) बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनआयटीकडे असलेल्या योजना आणि मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्न आहे. त्याच्या अविकसित क्षेत्राचा विकासाचा मुद्दा आहे. यावर अद्याप तोडगा निघायचा आहे. तो लवकरच निघेल. एनआयटी बरखास्तीबाबतची योग्य बाजू कोर्टात मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी