शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

जागतिक अन्न दिवस; नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 10:04 IST

भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे बुफे संस्कृतीतून वाया जाते अन्न  हॉटेलमधून निघते सर्वाधिक शिळे अन्न

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतात एकीकडे भूकेमुळे मरण पावणारी बालके, कुपोषण अशा समस्या भेडसावत असताना, दुसरीकडे लाखो टन अन्नाची नासाडी होत आहे, एकट्या नागपुरात रोज १५ टन अन्नाची नासाडी होत असल्याची माहिती आहे. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात रोज तीन ट्रक अन्न कचऱ्यात फेकले जाते, हे अधिक गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अन्न नासाडी ही चिंताजनक आणि संतापजनक असली तरी नागपुरात सार्वजनिक प्रसंग, उत्सव किंवा पारिवारिक समारंभ व हॉटेल्समध्ये सर्वात जास्त अन्न नासाडी होते. तज्ज्ञांच्या मते, पंक्ती, जेवणावळींमध्ये वाढणारा आणि खाणारा यांचा मेळ नसतो. त्यामुळे अन्नाची नासाडी होते. अन्नाची नासाडी कमी व्हावी यातून बुफेची संकल्पना पुढे आली. त्यातून नासाडी कमी होणे दूरच, ती पंगतीपेक्षाही दुपटीने वाढली आहे. महागाईत प्रचंड वाढ झाली आहे, हे खरे असले तरी नवश्रीमंत वर्ग, उच्च मध्यम व मध्यमवर्गाकडून ‘हॉटेलिंग'चा वापर वाढला आहे. आॅर्डर करताना पूर्वअंदाज न घेता डिशेशची मागणी केली जाते. भूकेचा अंदाज न घेतला गेल्याने बऱ्याचदा अन्न शिल्लक राहते. त्याचा परिणाम हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात शिळे अन्न फेकले जाते. गरजेपेक्षा दोन घास कमीची आॅर्डर केल्यास अन्नाची नासाडी टाळता येणार आहे. परंतु शहरात तसे होताना दिसून येत नाही. महापालिकेच्या हद्दीत सुमारे दोन हजारावर हॉटेल्स आहेत. यातील अनेक हॉटेल्सचालक उरलेले अन्न रात्री उशिरा कचरापेटीत किंवा नाल्यात फेकतात तर काही नियमानुसार मनपाकडे सुपूर्द करतात. अशा हॉटेल्सची केवळ ९०० वर संख्या आहे. त्यांच्याकडून रोज १५ टन शिळे अन्न मिळते. नागपुरात अर्धपोटी व उपासमार सहन करीत जगणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रोज वाया जणाऱ्या या अन्नावर या भूकेल्यांना चार घास मिळू शकतील एवढे हे अन्न आहे.विचार करायला हवाअन्नाची नासाडी टाळण्यासाठी अन्न खाताना विचार करायला हवा. त्यामुळे अन्नसाठा, साधनसंपत्ती वाचेल, भूकेल्यांना अन्न मिळेल आणि प्रदूषणावरही नियंत्रण येईल. अन्नासाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करीत असल्याने अन्नाचे नियोजन केल्यास ते तसेच साधनसंपत्तीही वाया जाणार नाही. अन्नाची नासाडी थांबविल्यास दूषित वायूची निर्मिती व त्यामुळे होणारे पर्यावरण प्रदूषणही थांबेल.प्यारे खानसामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर