शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाकाळकर पायउतार

By admin | Updated: May 20, 2017 02:46 IST

शहर काँग्रेसमधील यादवीला शुक्रवारी पूर्णविराम देत विभागीय आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर काँग्रेसमधील यादवीला शुक्रवारी पूर्णविराम देत विभागीय आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या सदस्यांनी गटनेतेपदी केलेली निवड योग्य ठरविली आहे. या निर्णयामुळे विद्यमान विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर पायउतार झाले आहेत. राजकीयदृष्ट्या विचार करता आयुक्तांच्या या निर्णयामुळे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार गटाला मात्र जबर धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते आणि स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर मुत्तेमवार गटाची कोंडी करण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त व अनिस अहमद एकत्र आले होते. या राजकीय कलगितुऱ्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची महापालिकेच्या स्वीकृ त सदस्यपदी होणारी अडचणीत आली आहे. ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज तूर्त वैध असला तरी या संदर्भात विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. सभागृहात फक्त नोंद केली जाणार गटनेता निवडीचा अधिकार सभागृहाला नाही. विभागीय आयुक्तांना हा अधिकार आहे. तसेच गटनेत्यांच्या शिफारशीनुसार स्वीकृत सदस्यांची निवड विभागीय आयुक्तांकडून केली जाते. याबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची नोंद महापालिका सभागृहात घेतली जाते. त्यानुसार आयुक्तांच्या निर्णयाची सभागृहात नोंद केली जाणार आहे. स्वीकृत सदस्याबाबत सभागृहात निर्णय स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू आहे. स्वीकृत सदस्याची निवड गटनेत्यांच्या शिफारशीने केली जाते. मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्णयापूर्वी असलेला गटनेता यांची शिफारस विचारात घ्यायची की निर्णयानंतर झालेल्या गटनेत्यांची शिफारस विचारात घ्यायची, याबाबतचा निर्णय सभागृहात घेतला जाईल. अश्विन मुदगल, आयुक्त, महापालिका पक्षविरोधी कारवायाची तक्रार पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची तक्रार प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केली आहे. पक्षाला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात निर्णय होईल. या प्रकरणात संजय महाकाळकर उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे. विकास ठाकरे, अध्यक्ष ,शहर काँग्रेस उच्च न्यायालयात जाणार काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष यांनी पत्र दिल्यानंतर व सर्व सदस्यांच्या संमतीनंतर विभागीय आयुक्तांनी माझी गटनेतेपदी निवड केली होती. परंतु नवीन गटनेता निवडण्यासाठी पक्षाने पत्र दिलेले नाही. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. संजय महाकाळकर, माजी विरोधीपक्षनेते, महापालिका