शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलाच्या धाकावर इव्हेंट ऑर्गनायजरला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:18 IST

नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अत्यंत संवेदनशील परिसर समजला जाणाऱ्या राजभवनसमोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ गुरुवारी दिवसाढवळ्या ही खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या राजभवनजवळच्या चौकात दिवसाढवळ्या लुटमारतक्रार मागे घे अन्यथा जीवे ठार मारू : धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियोजित कार्यक्रमाचे स्थळ बघण्यासाठी जात असलेल्या एका इव्हेंट ऑर्गनायजरला पिस्तुलाचा धाक दाखवून पाच आरोपींनी लुटले. त्याच्याजवळची २८ हजारांची रोकड लुटण्यापूर्वी आरोपींनी ‘मॅडमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे, अन्यथा ठोक डालेंगे ’ अशी धमकीही दिली. अत्यंत संवेदनशील परिसर समजला जाणाऱ्या राजभवनसमोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ गुरुवारी दिवसाढवळ्या ही खळबळजनक घटना घडली.विजय राजकुमार जादोन (वय २५) असे पीडित तरुणाचे नाव आहे. विजय मूळचा दिल्लीचा रहिवासी असून तो सध्या शिवशक्ती अपार्टमेंट, वर्धमाननगरमध्ये राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो नागपुरात शर्मा नामक व्यक्तीसोबत इव्हेंट आॅर्गनायजर म्हणून काम करतो. विजयच्या तक्रारीनुसार, त्याने भागीदाराच्या मदतीने काटोल मार्गावरील अंडरमून लॉनमध्ये १५ मार्चला एका कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. हे लॉन बघण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास विजय त्याच्या भागीदाराची दुचाकी घेऊन जात होता. त्याला लॉनच्या मार्गाची पक्की माहिती नसल्याने त्याने राजभवन समोरच्या त्रिकोणी गार्डनजवळ दुचाकी थांबवली. मोबाईलवर गुगल मॅपवरून तो लॉनचा मार्ग शोधत असताना अचानक बुलेट तसेच अन्य वाहनांवर आलेल्या पाच आरोपींनी त्याला गराडा घातला. सर्वांनी तोंडाला स्कार्फ बांधले होते. एका आरोपीने विजयची कॉलर पकडून त्याला कंबरेत पॅन्टमध्ये खोचलेले पिस्तुल दाखवले. ‘तुझ्या पार्टनरने मॅडमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार कशाला नोंदवली, अशी विचारणा करीत ती तातडीने मागे घ्यायला सांग. तुझ्या भागीदाराला एक-दोन वेळा समजावले. तू समजदार दिसतो, म्हणून तुला हे सांगत आहे, असे म्हणून आरोपींनी त्याला २४ तासात तक्रार परत घेतली नाही तर जीवे मारू’ अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या खिशात हात टाकून २८ हजारांची रोकड हिसकावून घेतली. पिस्तुल पाहून प्रचंड घाबरलेल्या विजय आरोपी निघून गेल्यानंतरही बराच वेळ एकाच ठिकाणी गप्प बसून राहिला. काही वेळेनंतर त्याने भागीदार शर्माला फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर गिट्टीखदान ठाण्यात पोहचला. त्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.कोण आहे मॅडम ?ज्या मॅडमखातर आरोपींनी विजयला धमकावून रोकड हिसकावून नेली, ती मॅडम कोण आहे, या संबंधाने चौकशी केली असता पोलिसांकडून पुढीलप्रमाणे माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार, विजय आणि त्याचा भागीदार शर्मा या दोघांनी निधी नामक मॅडमसोबत रेशीमबागेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकीट विक्रीची रक्कम मॅडमच्या खात्यात जमा झाली होती. सर्व खर्च वजा जाता उर्वरित २२ लाख रुपये ३० डिसेंबर २०१८ पर्यंत देण्याचे मॅडमने विजय आणि त्याच्या भागीदाराला सांगितले होते. मात्र, बराच वेळ टाळाटाळ केल्यानंतर मॅडमने आता रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. तिकडे देणेकरांचा तगादा लागल्याने विजय आणि भागीदाराची कोंडी झाली. परिणामी शर्माने सीताबर्डी ठाण्यात मॅडमविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली. ती परत घ्यावी तसेच रक्कम परत मागू नये म्हणून शर्माला काही जणांनी यापूर्वीही धमकावले होते, असे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा