शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन मुंबईत असले तरी विदर्भावर अन्याय होणार नाही : नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 18:04 IST

एका कार्यक्रमासाठी त्या नागपूरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या.

नागपूर : नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. हे अधिवेशन ज्वलंत समस्या सोडण्यासाठी उपयोगी पडते. कोरोनाचे सावट अद्याप आहेच, कोविडमुळे सरकारचा नाईलाज झाला. त्यामुळे अधिवेशन मुंबईला घेण्यात आले. असले तरी विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, व विदर्भातील जास्तीत जास्त प्रश्न चर्चेला येतील, असा आमचा प्रयत्न असल्याची ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

एका कार्यक्रमासाठी त्या नागपूरात आल्या असता पत्रपरिषदेत बोलत होत्या. मुंबईत घेण्यात आलेल्या अधिवेशनाचाही कालावधी कोरोनामुळेच कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आता परिस्थिती निवळत चालली आहे. पुढील काळात परिस्थिती बदलल्यावर नियोजित बैठका आणि कार्यक्रम होतील, असे त्या म्हणाल्या. 

कौटुंबिक समुपदेशन गरजेचे

महिला हिंसाचाराच्या दोन-तीन घटना नागपुरात घडल्या. एका व्यक्तीने पत्नीला मारून स्वतः आत्महत्या केली. अशा घटना टाळण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन सेवा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी ५२ क्रमांकाचे विधेयक सभागृहात येणार आहे. त्यामधे समुपदेशन, महिला सुरक्षा आदी गोष्टींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालक-शाळेचा वाद दुर्दैवी 

मुलांना मोफत शिक्षण देऊ नका, पण काही सवलत द्या. पुण्यात पालकांना मारहाणीचा प्रकार बघितला. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशाप्रकारची दंडेलशाही योग्य नाही. एखाद्याने मुलाची फी माफ करा असे वाद घातला तर इतर सर्वच पालक वाद घालतील. त्यामुळे चर्चेने प्रश्न सोडविता येतील. पुण्यात काही शाळा अवैध आहेत. त्याची नोंदणी नाही पालकांची दिशाभूल केली जाते.

अधिवेशनात शाळांच्या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्र्यांना पुढच्या दोन-तीन दिवसात बैठक घेण्याची आपण विनंती करणार आहो. पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा करु नये. शाळा बंद व्हायला नको. दुसरीकडे शैक्षणिक शुल्कामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायला नको असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNeelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाVidarbhaविदर्भBudgetअर्थसंकल्प 2022