शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:39 IST

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.

ठळक मुद्देसिमेंट रोडसह विकासकामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपा आयुक्तांनी नवीन विकासकामांना ब्रेक लावले होते. सुरू असलेले प्रकल्प, सिमेंट रोडची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अर्धवट सिमेंट रोडची कामे पावसाळ्यापूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन सुरू होताच कामे ठप्प पडली. महापालिकेत लहानमोठे २०० कंत्राटदार आहेत. प्रत्येकाकडे सरासरी २० ते २५ कामगार आहेत. म्हणजेच ४ ते ५ हजार कामगार काम करीत होते. यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कामगारांचा समावेश आहे.तसेच इंजिनिअर, ट्रकचालक, टिप्पर चालक अशा कुशल कामगारांचाही यात समावेश आहे. आधीच बिल वेळेवर मिळत नाही. त्यात अर्धवट कामामुळे कंत्राटदारांना बिल सादर करणे शक्य नाही. पुढे काही महिने बिल मिळण्याची शक्यता नाही. अशा कोंडीत कंत्राटदार सापडले आहेत. होळीसाठी गावी गेलेले कामगार परतले होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने व जवळ पैसे नसल्याने कामगार मिळेल त्या साधनाने गावी गेले. मनपा कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कामगारांना थांबविण्यासाठी त्यांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसै नव्हते. त्यामुळे कामगारांना थांबविणे शक्य झाले नाही.पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोड पूर्ण होणे अशक्यलॉकडाऊनमुळे सिमेंट रोडसह प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्याने इतक्यात ते परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे सिमेट रोडची अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.कामगार नाहीत, सिमेंटचे दरही वाढलेनवीन कामांना मंजुरी नाही. जुनी कामे सुरू होती. त्यात पावसाळ्यानंतर मनपातील कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. वेळेवर बिले मिळत नाहीत. लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगार बांधकाम क्षेत्रात काम करीत नाहीत. कंत्राट घेतला तेव्हा सिमेंटच्या बॅगेची किंमत २४० रुपये होते. आता ३७० रुपये झाली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. अशा अडचणीत मनपातील कंत्राटदार सापडले आहेत. प्रशासनाने किमान बिल दिले तर थोडा दिलासा मिळेल. विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राट संघटना

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगार