शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

दीड वर्षे झाली तरी कामाला अद्याप गती नाही

By admin | Updated: April 9, 2017 02:26 IST

शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. एकाच वेळी शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे.

आणखी किती वर्ष लागणार? : अजनी रेल्वे ते अजनी चौक रोडची अवस्था दयनीय नागपूर : शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. एकाच वेळी शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. परंतु या रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. अजनी रेल्वे पूल ते अजनी चौक या दरम्यानच्या सिमेंट रोडचे काम तब्बल दीड वर्षानंतर सुरू झाले, पण कामाला गती नाही. या कामाला आधीच विलंब झाला आहे. आता या कामाला सुरुवात झाली. परंतु गती नसल्याने काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रोडच्या एकाच बाजूला वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एका बाजूची वाहतूक बंद असल्याने चुनाभट्टी भागातील नागरिकांना त्रास होत आहे. चुनाभट्टी हा वळणमार्ग असल्याने सायंकाळच्या सुमारास या मार्गावरील वाहतुक ीची कोंडी होते. या रोडची प्रत्यक्ष पाहणी केली असता अजनी रेल्वे पूल चौकात टिन लावून एका बाजूचा मार्ग बंद करण्यात आला आहे. येथे मोठे फलकही लावण्यात आले आहे. यावरील मजकुरानुसार या रोडचे काम महापालिकेने मुंबईच्या युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सध्या एका बाजूने सिमेंट रोडचे काम सुरू आहे. युनिटी इन्फ्राप्रोजेक्टला २१ जानेवारी २०१५ रोजी कार्यादेश देण्यात आले. जानेवारी २०१७ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. परंतु कार्यादेशानंतर दीड वर्षाने कामाला सुरुवात करण्यात आली. बाजूलाच दुसरा फलक लावण्यात आला आहे. यावर वाहतूक पोलीस उपायुक्तांनी मार्ग वळविण्यात आल्याची सूचना लिहिली आहे. यावर ११ जानेवारी २०१८ ही तारीख आहे. त्यामुळे कंपनीने जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. आधीच कामाला विलंब झाला असतानाही गती नाही. पावसाळा सुरू होण्याला दोन महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. कामाची गती अशीच राहिल्यास पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. (प्रतिनिधी) कामाची गती का थांबली महापालिका निवडणुका विचारात घेता गेला पावसाळा संपताच शहरातील सर्व भागात दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडच्या भूमिपूजनाचा धडाका लावला होता. सुरुवातीला दिवसरात्र या रोडची कामे सुरू होती. कामाची गती लक्षात घेता सहा महिन्यात सिमेंट रोडची कामे पूर्ण होतील, असा शहरातील नागरिकांना विश्वास होता. परंतु निवडणुका संपताच कामे ठप्प पडली. अचानक कामाची गती का थांबली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कामाचा उत्तम दर्जा कसा राहणार? या कामाच्या ठिकाणी सकाळी भेट दिली असता येथे एकही मजूर कामावर नव्हता. अजनी रेल्वे पूल ते चुनाभट्टी दरम्यान एका बाजूने सिमेंटचा थर टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी त्यावर खाली बारदाना झाकण्यात आला आहे. परंतु पाणी टाकण्यात आले नव्हते. या संदर्भात परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता, गेल्या तीन -चार महिन्यापूर्वी या कामाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली. या रोडच्या कामामुळे चुनाभट्टी येथील रहिवाशांना फेऱ्याने ये-जा करावी लागते.