शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नागपूर मेयो इस्पितळ वर्ष होऊनही २५० खाटा मंजुरीअभावीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 8:15 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत आली आहेत. अल्प कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार वाढल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.

ठळक मुद्दे परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे अडचणीत आली आहेत. अल्प कर्मचाऱ्यांवर रुग्णांचा भार वाढल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे.भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) मानकानुसार एकाच इमारतीत सर्व वॉर्ड व विभाग असणे आवश्यक आहे. परंतु मेयो रुग्णालयातील बहुसंख्य वॉर्ड विविध इमारतीत विखुरलेले होते. याला घेऊन ‘एमसीआय’ दरवर्षी त्रुटी काढून कोंडी करीत होती. मेयो रुग्णालयाच्या विकासाला घेऊन २०१० मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. यात २५० खाटांच्या इमारतीच्या विकासाचाही समावेश होता. परंतु अनेक घडामोडीनंतर ही इमारत एप्रिल २०१७ मध्ये रुग्णसेवेत रुजू झाली. मेयोच्या जुन्या ५९० खाटांमध्ये २५० खाटांची भर पडली. अस्थिरोग, ईएनटी, नेत्र, व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध करून देण्यात आले. वाढीव खाटांमुळे जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना खाट मिळाली. मात्र, जुन्या खाटांच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची ७३ पदे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २०० पदे, फार्मासिस्टची ६ पदे , तंत्रज्ञाची ५ पदे याशिवाय इतरही पदे रिक्त आहेत. या जागा न भरताच नव्याने २५० नव्या खाटांची भर पडल्याने सर्वांवरच कामाचा ताण पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) देऊन नव्या खाटांना मंजुरी देऊन त्या दृष्टीने वाढीव पदांची मागणी केली. परंतु ‘डीएमईआर’ या गोष्टींपासून अनभिज्ञच असल्याचे दाखवित आहे. कामाच्या ताणामुळे काही कर्मचारी सुटींवर गेले आहेत तर जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये कामाला घेऊन रोज भांडणे होत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. यात गरीब रुग्ण अडचणीत सापडला आहे.८३३ खाटा परिचारिका केवळ ४७५मेयो रुग्णालयामध्ये जुन्या व नवीन खाटा मिळून ८३३ खाटा आहेत. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ ४७५ आहे. यातील साधारण ३० टक्के परिचारिका सुटीवर असल्याने एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे. वाजवीपेक्षा कामाचा ताण वाढल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच स्थिती कर्मचाऱ्यांची आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)nagpurनागपूर