वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला पोषण देणारा व गतिशील करणारा आहे. अर्थसंकल्पात सहा स्तंभांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. सुदृढ भारतासाठी नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार १८० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव स्तुत्य आहे. एकंदरीत यंदाचा अर्थसंकल्प संकटातून संधी निर्माण करणारा आहे.
- अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजपा.
भारताचे पुनर्निर्माण गतीने करणारा अर्थसंकल्प
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे उत्पन्न कमी झालेले असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देणारा व नवीन आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी परिणामकारक असा आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकरात मोठी सूट देण्यात आली आहे.
- डॉ. राजीव पोतदार
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य