शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा सुरू करण्यासाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 8:50 PM

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय शाळा मंडळाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समित्यांची रचना व कार्य निश्चित करण्याचे अधिकार स्थायी समितीला देण्यात आलेले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय शाळा मंडळाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समित्यांची रचना व कार्य निश्चित करण्याचे अधिकार स्थायी समितीला देण्यात आलेले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.विधानसभा सदस्य पांडुरंग बरोरा, शशिकांत शिंदे, मंगेश कुडाळकर, डी.पी. सावंत, संदीपानराव भुमरे, तृप्ती सावंत, मनोहर भोईर, संजय पोतनीस, दीपिका चव्हाण, हनुमंत डोळस आदींनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.रायगडमधील ३२ अनधिकृत शाळांना बंदची नोटीसरायगड जिल्ह्यातील ३२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून या अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे सूचित केले आहे तसेच त्या शाळा बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.अ‍ॅड. आशिष शेलार, अ‍ॅड. पराग अळवणी, प्रशांत ठाकूर, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदींनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर या तावडे यांनी अनधिकृत शाळा बंद करताना त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लगतच्या मान्यतापाप्त शाळेमध्ये समायोजन करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.गडकिल्ल्यांवर लोकवर्गणीतून स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीनमहाराष्ट्रातील ५१ गडकिल्ल्यांवर स्वच्छतागृह बांधण्यासाठी सेवाभावी संस्थेने लोकवर्गणीतून उभ्या केलेल्या निधीमधून शौचालय बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.सदस्य मेधा कुलकर्णी यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता. माहितीच्या अधिकारानुसार राज्यातील ५१ किल्ल्यांवर एकही शौचालय नसल्याची बाब फेब्रुवारी २०१८ मध्ये उघडकीस आली. त्यामुळे गडकिल्ल्याचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने सेवाभावी संस्था पुणे आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यावर स्वच्छतागृह बांधण्यासाठी संस्थेने लोकवर्गणीतून निधी उभारला असून त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८vidhan sabhaविधानसभा