शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

दहा स्वतंत्र मोटर अपघात दावा न्यायालये स्थापन करा

By admin | Updated: June 30, 2014 00:43 IST

रस्त्यावरील अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस भरपाई किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी नागपुरात दहा स्वतंत्र मोटर अपघात दावा न्यायालये

१८ वर्षांपासून पाठपुरावा : दर सहा मिनिटाला एकाच मृत्यूनागपूर : रस्त्यावरील अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस भरपाई किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी नागपुरात दहा स्वतंत्र मोटर अपघात दावा न्यायालये एकत्रितरीत्या तळमाळ्यावर असावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मोहिते यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी मोहिते गेल्या १८ वर्षांपासून लढा देत आहेत, हे विशेष.अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढरस्त्यावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातातील पीडितांना न्याय न मिळाल्यांची यादी मोठी आहे. मोहिते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, मागणीनंतर महाराष्ट्र शासनाने जिल्हा न्यायालय इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या माळ्यावर प्रत्येकी दोन आणि सातव्या माळ्यावर एक अशी पाच न्यायालये सुरू केली. पण ती पीडितांसाठी अडचणीची ठरली आहे. न्यायालयात अपंगांसाठी स्वतंत्र लिफ्ट नसल्याने त्यांना ये-जासाठी त्रास होतो. शिवाय मृताच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासंदर्भातील हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. वाढत्या अपघातामुळे शासनाने स्वत:च्या इमारतीत तळमाळ्यावर दहा मोटर अपघात दावा न्यायालये सुरू करावीत, अशी मागणी मोहिते यांनी गडकरी यांच्याकडे लावून धरली आहे. त्यांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. या प्रश्नावर विधिमंडळात चर्चास्वतंत्र्य न्यायालयासाठी मोहिते यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केला आहे आणि तो आजही सुरूच आहे. त्यांच्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जागेच्या उपलब्धतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. जागेचा प्रश्न विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित झाला होता. त्यानंतरही हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. देशात रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्वतंत्र न्यायालयाचा प्रश्न सरकारने तातडीने निकाली काढावा, अशी मागणी मोहिते यांनी शासनाकडे केली आहे. दर सहा मिनिटाला एकाचा मृत्यूभारतात दररोज वाहन अपघातात सरासरी २५० माणसे जीव गमावतात तर ७०० व्यक्त ी जखमी अथवा क ायमच्या अपंग होतात. म्हणजेच दर ६ मिनिटाला एक व्यक्ती दगावते तर दर मिनिटाला एक व्यक्ती जखमी होते. ही संख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही खूप जास्त आहे. नागरिकांमध्ये वाहतुकींच्या नियमांबाबत जागरूकता नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. अपुरी साधनसामग्रीअपुऱ्या साधनसामग्रीमुळे अपघातांवर नियंत्रण मिळविण्यात अनेक अडचणी येतात आणि दोषींवर कारवाई होत नाही. रात्रीच्या वेळी अपघात होऊ नये म्हणून यंत्रणा कमी पडते. स्पिड गन, क्रेन यासारखे साहित्यही अपुरे आहे. अशा वस्तू नादुरुस्त झाल्या की वेळीच दुरुस्तही के ल्या जात नाहीत. दंडात्मक कारवाई करामद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मार्गांवर पट्टे तसेच सूचनात्मक चिन्हांचे मार्गदर्शक बोर्ड लावण्यात आले आहेत. भावनिक आवाहन करणारे सूचना फलक महामार्गांवर आहेत. त्यानंतरही एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबीयांना सोसावा लागतो. (प्रतिनिधी)