शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 22:17 IST

केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी दाखविली हिरवी झेंडी : मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.रविभवन परिसरातून केरळच्या पूरग्रस्त नागरिकांना विशेषत: महिलांसाठी आवश्यक असलेले साहित्य, कपडे, मच्छरदाणी व मुलांसाठी अत्यावश्यक मदत येथील डी. पी. जैन कंपनीच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष दीपक जैन व व्यवस्थापकीय संचालक गिरीश जैन यांनी पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली आहे. यासाठी गिट्टीखदान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नागपूर येथून विविध मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पाठविताना दीपक जैन व गिरीश जैन यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत पाठणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केरळसाठी रवाना केले.मर्चन्डाईज व्हैन्च्युरीअस प्रा. लि. च्या माध्यमातून ही मदत गोळा करण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकेट, टॉवेल, बेडशीट, महिलांसाठी आवश्यक असलेले कपडे, सॅनिटरी पॅड, ओडोमॉस क्रीम, लहान मुलांना आवश्यक असलेले सर्व साहित्य तसेच कपडे, मच्छरदाणी, साबण तसेच दैनंदिन अत्यावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ असलेला ट्रक गुरुवारी रवाना करण्यात आला. केरळमध्ये आलेल्या या भीषण संकटकाळामध्ये लाखो नागरिक बेघर झाले आहे. सध्या विविध निवारा शिबिरामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी सामाजिक दायित्व समजून केरळ येथील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यावेळी अविनाश बडगे, नितीन श्रावगी, आदित्य आसोपा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेKerala Floodsकेरळ पूर