शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमणांचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:29 IST

फुटाळा तलावाच्या पूर्वेकडील जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. ही जागा विकसित करण्याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्यात २०१० मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार तलाव परिसरात २२ किओक्स उभारण्यात आले होते. मात्र २०१५ मध्ये याची लीज संपली. त्यानंतर लीजला मुदतवाढ देण्यात आली नाही. तसेच तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले नाही. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी येथील २२ किओक्सवरील ८५ शटरवर हातोडा चालविण्यात आला.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई : नागपूर सुधार प्रन्यासचा २२ किओक्सवरील ८५ शटरवर हातोडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या पूर्वेकडील जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. ही जागा विकसित करण्याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्यात २०१० मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार तलाव परिसरात २२ किओक्स उभारण्यात आले होते. मात्र २०१५ मध्ये याची लीज संपली. त्यानंतर लीजला मुदतवाढ देण्यात आली नाही. तसेच तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले नाही. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी येथील २२ किओक्सवरील ८५ शटरवर हातोडा चालविण्यात आला.तलाव सौंदर्यीकरण व सुविधांची देखभाल, दुरुस्तीचा आर्थिक भार नासुप्रवर पडू नये म्हणून नासुप्रने सार्वजनिक खासगी सहभाग या तत्त्वावर देखभाल व दुरुस्तीचा कंत्राट १७ फेबुवारी २०१० मध्ये मे. सेल अँडस, नागपूर यांना पाच वर्षाकरिता दिला होता. त्यात अटी व शर्थीबाबत करारनामा झाला होता. करारनाम्यानुसार २० ठिकाणी मोबाईल किओक्स बांधून परिसर विकसित करायचा होता. मे. सेल अँडस, नागपूर यांनी ही मोबाईल किओक्स पोटभाडेकरू यांना दिली होती. मे. सेल अँडस, यांनी करारनाम्यातील अटी व शर्ती भंग केल्यामुळे त्यांचा करारनामा नासुप्रने संपुष्टात आणला होता. परंतु पोटभाडेकरूंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार मोबाईल किओक्सवरील ८५ शटरवर कारवाई करण्यात आली.यात पेस्टो स्नॅक्स, कटिंग चाय, स्पाईस आॅफ हैद्राबादी, दिनशा आईसक्रिम, लेक साईड ग्रिल, ओम असोसिएटस, अँपल किजीन, गायत्री फूड, क्रॅकरर्स, संतोष पकोडेवाला, मे. शकिल असोसिएटस, तायो कॅफे, कॅफे विला, कपूर धाबा, पॅनिनोज, काठी रोल, गोलीवडा पाव (ओम असोसिएटस), बब्बुज रेस्टॉरंट, फर्स्ट लव रेस्टॉरंट, लेक साईड ग्रिल, टोस्ट, डॉमिनोज या ठिकाणी कारवाई करण्यात आली.सदर अतिक्रमण कार्यवाही पाच टिप्पर आणि सहा जेसीबीच्या साहाय्याने दुपारी १ ते सायकांळी ७ पर्यंत करण्यात आली. ही कारवाई अभियंता (पश्चिम) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी(पश्चिम) आभोरकर, पोलीस निरीक्षक अंबाझरी, खंडागळे, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.तीन वर्षानंतर कारवाईलीजचा कालावधी २०१५ मध्ये संपला होता. त्यावेळी लीजला मुदतवाढ देण्याची वा येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाई होणे अपेक्षित होती. मात्र नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई करण्यात आली. कारवाई वेळीच का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी उपस्थित केला आहे. 

हायकोर्टाने फेटाळली याचिकानागपूर सुधार प्रन्यासने दुकाने हटविण्याची नोटीस बजावल्यामुळे नऊ दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांनी विविध बाबी लक्षात घेता, नासुप्रची कारवाई योग्य ठरवून दुकानदारांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दुकानदारांनी दुकाने हटविण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती विनंतीही अमान्य केली. दुकानदारांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावEnchroachmentअतिक्रमण