शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

कट रचूनच युगची हत्या

By admin | Updated: May 6, 2016 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयामध्ये घटनाक्रमावर प्रकाश टाकून आरोपींनी युगची हत्या कट रचून केली होती, असे स्पष्ट केले.

हायकोर्टाचा निष्कर्ष : निर्णयात घटनाक्रमावर टाकला प्रकाश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयामध्ये घटनाक्रमावर प्रकाश टाकून आरोपींनी युगची हत्या कट रचून केली होती, असे स्पष्ट केले.आरोपी राजेश हा डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. एक दिवस तो राजेश हाताळीत असलेल्या संगणकावर गेम खेळत बसला होता. यावरून राजेशने युगला थापड मारली होती. परिणामी डॉ. चांडक यांनी राजेशला रागावून यापुढे अशी चूक केली तर खबरदार, असे बजावले होते. याशिवाय राजेश रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसूल करीत होता. यासंदर्भात अनेक रुग्णांनी डॉ. चांडक यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला कामावरून काढून टाकले होते. अन् अश्रू झाले अनावरगुरुवारी निर्णय येणार हे आधीच माहीत असल्यामुळे युगचे वडील डॉ. मुकेश चांडक, त्यांचे नातेवाईक व वकील न्यायालयात मोठ्या संख्येत उपस्थित होते. यामुळे न्यायालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती. न्यायालयाने दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम करीत असल्याचे सांगताच डॉ. चांडक यांना अश्रू अनावर झाले. त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. त्यांना थोड्या वेळासाठी भोवळ आली. नातेवाईकांनी पाणी दिल्यानंतर ते शांत झाले.याचा राग राजेशच्या मनात होता. त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. राजेशला डॉ. चांडक यांच्या घरातील सर्व परिस्थिती माहीत होती. युग कधी शाळेत जातो. शाळेतून कधी परत येतो हे त्याला माहीत होते. राजेशकडे डॉ. चांडक यांच्या रुग्णालयाचा लाल रंगाचा टी-शर्ट होता. कुणालाही शंका येऊ नये म्हणून हा टी-शर्ट त्याने अरविंदला घालायला दिला. घटनेच्या दिवशी आरोपी युगच्या घरापुढे उभे राहिले. अरविंद रुग्णालयाचा टी-शर्ट घालून असल्यामुळे कुणालाही तो बाहेरचा व्यक्ती असल्याचा संशय आला नाही. राजेश थोडा पुढे उभा होता. युग शाळेच्या बसमधून खाली उतरताच अरविंदने त्याला बोलावले. रुग्णालयात जायचे असल्याचे सांगितल्यामुळे युग त्याच्या दुचाकीवर बसला. काही अंतरावरून राजेशही गाडीवर बसला. यानंतर आरोपींनी युगला कोराडी रोडने निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याची हत्या केली. शवविच्छेदन अहवालात युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी युगच्या अंगातील टी-शर्ट काढून टाकला. युगचा मृतदेह पुलाखालील रेतीमध्ये पुरला व डोक्यावर मोठा दगड ठेवला. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता यानंतर चांडक यांना खंडणीसाठी दोन वेळा फोन केले. आरोपींनी युगच्या अपहरणासाठी तिसऱ्या व्यक्तीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्या व्यक्तीने या गुन्ह्यात सहभागी होण्यास नकार दिला.