शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

नागपुरात नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:56 IST

यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.

ठळक मुद्देअनुप कुमार : नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व तयारीबाबत समन्वय आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आले असून पूरप्रवण परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात बुधवारी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व तयारीबाबत समन्वय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, वर्धाचे शैलेश नवाल, भंडाराचे शंतनू गोयल, गोंदियाच्या डॉ. कादंबरी बलकवडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, मनपा आयुक्त नागपूरचे वीरेंद्र्र सिंह, मनपा आयुक्त चंद्रपूर संजय काकडे, विशेष पोलीस शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, वायुसेनेचे एम. के. सिन्हा, सुजीत भोसले, कामठीचे कर्नल सी. के. राजेश, प्रादेशिक हवामान केंद्र्राचे संचालक ए. डी. ताथे, जे. आर. प्रसाद, सीताबर्डी किल्ला ११८ बटालियनचे सुभेदार वीरेंद्र्रसिंह शेखावत, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एस. डी. धुमाळ,मुख्य वनसंरक्षक संजीव गौर, मुख्य कार्यपालन अधिकारी, मनपा अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, तहसिलदार रवींद्र माने, विभागीय नियंत्रण कक्षाचे नितेश बंभोरे, जयंत डोंगरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवासर्व जिल्ह्यांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्यायावत असावे. धोकाप्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होवून जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवावी. जेणेकरून मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नाही. पूरप्रवण परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी त्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा अद्यायावत असावी. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्व स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.प्रत्येक जिल्ह्यात ‘हेलिपॅड’ तयार ठेवानागपूर मेट्रोच्या कामामुळे अतिवृष्टीच्या काळात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, यासाठी नागपूर महानगरपालिकेने पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवावी. आपापल्या जिल्ह्यातील हेलिपॅड तयार ठेवावेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने मॉकड्रीलच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक बचाव कार्याचे धडे देऊन त्यांची टीम बचाव कार्यासाठी तयार ठेवावी. यावेळी वायुसेनाचे एम. के. सिन्हा यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुर्गम भागात तातडीने मदत पोहचविण्यासाठी हेलिपॅडची जागा निश्चित असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास शाळेचे पटांगण यासारख्या तत्सम जागेची निवड करून ठेवण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.जनजागृतीवर भर द्यापावसाळ्यामध्ये वीज कोसळून घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी या कालावधीत मुख्यत्वे शेतात असतात. यामुळे विजेपासून संरक्षण कसे करावे, यासाठी जनतेमध्ये व्यापक जनजागृती निर्माण व्हावी म्हणून स्वयंसेवक, एनजीओ, वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आदींची मदत घ्यावी. येत्या पावसाळी अधिवेशन काळात विविध आंदोलने व मोर्चांच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठीची अतिदक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अनुप कुमार यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nagpur Divisional Commissioner Officeनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयnagpurनागपूर