शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मते निघाली समान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:05 IST

नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते समान निघाली आहेत. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्याने ती रात्री उशिरापर्यंत चालली.

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत चालली मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते समान निघाली आहेत. सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्याने ती रात्री उशिरापर्यंत चालली.ईव्हीएम हॅक करून मतांची हेराफेर करता येत असल्याचा दावा करण्यात येत होता. यामुळे अनेकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत होती. अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमचा विरोध केला. ईव्हीएमवर मतदान न घेता मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ईव्हीएमला व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आली. या व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांचीसुद्धा मोजणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची (मतपत्रिका) मोजणी करण्यात आली.नागपूर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील ३० व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करण्यात आली. गेल्या गुरुवारी ईव्हीएममधील मतांची मोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. काही विधानसभेची मोजणी लवकर सुरू झाल्याने तेथील व्हीव्हीपॅटची मोजणी आधी झाली तर काहींची नंतर साधारणपणे ९ वाजेपासून व्हीव्हीपॅटची मोजणी सुरू झाली. ती रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत चालली. दरम्यान तसेच मॉक पोल दरम्यान झालेली मते क्लिअर (रद्द) न केल्याने पाच व्हीव्हीपॅटमधील मतांचीसुद्धा मोजणी करण्यात आली नाही. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते सारखीच निघाली. व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी ईव्हीएममधील मतांच्या मोजणीनंतर झाली. एकाही ठिकाणी तफावत आढळून आली नसल्याची माहिती निवडणूक विभागामार्फत देण्यात आली.रामटेकच्या व्हीव्हीपॅटची मोजणी सकाळपर्यंत चाललीरामटेक लोकसभा मतदार संघात एकूण २५ फेऱ्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार होती. त्यांची ईव्हीएमची मोजणीही जवळपास ११ वाजेपर्यंत चालली. परंतु व्हीव्हीपॅटची मोजणी सकाळपर्यंत सुरू होती.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVVPATव्हीव्हीपीएटीnagpur-pcनागपूर