शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण म्हणजे केवळ वाघ नव्हे

By admin | Updated: December 28, 2016 03:29 IST

सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे.

मारुती चितमपल्ली : अनिल पिंपळापुरे यांना वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान नागपूर : सध्याच्या काळात सर्वत्र वाघाला फार महत्त्व दिले जाते. वाघाचे संरक्षण म्हणजेच वन व पर्यावरणाचे संरक्षण, असा प्रचार केला जात आहे. मात्र जंगलामध्ये अनेक प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांचा अधिवास असतो. आजच्या परिस्थितीत वनांमधील विविध प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्याही संवर्धनाला तेवढेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ वाघाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन नव्हे, असे परखड मत आणि त्याची खंत वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. वनराई फाऊंडेशनच्यावतीने पक्षितज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांना स्व. लक्ष्मीकांत हरकरे स्मृती वन्यजीव संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. धनवटे सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, आमदार मितेश भांगडिया, वनराईचे अध्यक्ष अनंत घारड, गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, डॉ. गोपाळ ठोसर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मारुती चितमपल्ली यांनी वेद, पुराणातील दाखले देत पक्षी, प्राण्यांविषयी असलेले मिथक सांगत पक्षिशास्त्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची गरज व्यक्त केली. याप्रसंगी माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही पर्यावरण ऱ्हासावर चिंता व्यक्त केली. लहानपणी अवतीभवती दिसणाऱ्या चिमण्या आज दिसेनाशा झाल्या. श्राद्ध घालायच्या वेळीही कावळे शोधत फिरावे लागते. पक्षी, प्राणी व माणसांचा एवढा घनिष्ठ संबंध होता की, आमचे साहित्यविश्व त्या कथा, कादंबऱ्यांनी व्यापून गेले आहे. मात्र शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या पिपासेपायी सर्व नष्ट होत आहे. आम्ही आपली संस्कृती विसरत चाललो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी माळढोक, ग्रे हॉन बील या पक्ष्यांवर केलेल्या अभ्यासाबाबत माहिती दिली. २० वर्षांपूर्वी ११ राज्यांत अडीच हजाराच्यावर असलेल्या माळढोक पक्ष्यांची संख्या आज शंभर-सव्वाशेवर उरली आहे. वरोरा, उमरेड भागात १० वर्षांपूर्वी २० ते २५ पक्षी आम्ही शोधले होते. हवा तसा लोकसहभाग मिळत नसल्याने या पक्ष्यांची संख्या नाममात्र उरली आहे. येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्वी शहराबाहेर गावाच्या वाटेने गेले की हिरवेगार माळरान, तलाव आणि पक्ष्यांचे थवे दिसायचे. आज शहरीकरणाच्या झपाट्यात ते सर्व लुप्त होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संचालन वनराईचे अजय पाटील यांनी केले तर नितीन जतकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)