शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून नागपुरातील बाजारांमध्ये उत्साह परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:17 IST

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर शहरात उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्व दिशेने शटर असलेली दुकाने उघडता येतील.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्वेकडील दुकानांचे शटर उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर शहरात उत्तर ते पूर्व आणि दक्षिण ते पूर्व दिशेने शटर असलेली दुकाने उघडता येतील.उल्लेखनीय असे की, मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता आयुक्तांनी आपल्या आदेशात उर्वरित सर्व दुकाने उघडण्याला परवानगी दिली आहे. एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील. अशा ऑड व ईव्हन तारखेबरोबर शहरात ही नवीन व्यवस्था केली आहे.आॅड तारखेला उत्तरेकडून पूर्व व दक्षिण ते पूर्व दिशेने शटर असलेली दुकाने आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम आणि दक्षिण ते पश्चिम दिशेला शटर असलेली दुकाने उघडतील. शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही. कोविड -१९ चा रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा आयुक्तांनी प्रतिबंध क्षेत्र घोषित केलेल्या भागात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर सेवा बंद राहतील.असे असतील नियममॉल व मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी ९ संध्याकाळी ५ पर्यंत सुरू राहतील.ऑड-ईव्हन व्यवस्थेअंतर्गत पहिल्या दिवशी बाजारात दुकानांची एक लाईन व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील.ऑड तारखेला उत्तर ते पूर्व व दक्षिण ते पूर्व आणि ईव्हन तारखेला उत्तर ते पश्चिम व दक्षिण ते पश्चिमेकडे शटर असलेली दुकाने उघडतील.कोणत्याही आस्थापना किंवा दुकान मालकास दुकानाच्या दिशेसंदर्भात संभ्रम असल्यास ते झोनच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधू शकतात.कपड्यांच्या दुकानात ट्रायल कक्ष बंद असतील. तयार कपड्यांच्या कोणत्याही परताव्याची किंवा बदलीची परवानगी नाही.बाजारातील सुरक्षित अंतर पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची राहील.दुकानदारांना होम डिलिव्हरी, टोकन सिस्टिम आणि मार्किंगच्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलचा वापर करून वाहन वापरणे टाळा.नियमांकडे कुठेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्यास, दुकान किंवा बाजार बंद करण्याचा मनपाला पूर्ण अधिकार राहील.टॅक्सी-कॅब, ई-रिक्षा, चारचाकी वाहनांसाठी वन प्लस टू फॉर्म्युला अस्तित्वात येईल, तर दुचाकीवरून एकालाच प्रवास करता येईल.नागपूर शहर हद्दीत हे बंद राहतीलशाळा-महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासआंतरराष्ट्रीय विमान सेवा (विशेष बाबतीत गृह मंत्रालयाच्या परवानगी वगळता)मेट्रो रेल, विशेष परवानगी गाड्या आणि घरगुती विमान वगळता सामान्य सेवासिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, इन्डोर स्टेडियमशॉपिंग मॉल, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सभागृहसर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना, एकत्रित पुजापाठहेयर कटिंग सलून, स्पा आणि ब्युटी पार्लरशैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर तत्सम कार्यक्रमयाचे पालन आवश्यक करावे लागेलसार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्क अनिवार्यसुरक्षित अंतर पाळलेच पाहिजेविवाह सोहळ्यात ५० हून अधिक लोकांना आणि अंत्यसंस्कारात २० हून अधिक लोकांना परवानगी नाही.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हासार्वजनिक ठिकाणी दारू, मद्यपान, तंबाखूचे सेवन करण्यास मनाई आहेकामावर नियमित स्वच्छता करणे, सुरक्षित अंतराचे पालन करणेआजपासून सुरू होणार सराफा बाजार प्रशासनाच्या नवीन नियमानुसार सम-विषम (इव्हन-आॅड) पद्धतीने शहरातील सराफा व्यापाऱ्यांची दुकाने ५ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली.नियमानुसार पूर्व आणि उत्तर मुखी शटर/गेट असलेली दुकाने विषम अर्थात १, ३, ५, ७, ९ अशा तारखांना आणि पश्चिम मुखी शटर/गेट असलेली दुकाने सम अर्थात ०, २, ४, ६, ८, १० अशा तारखांना खुली राहणार आहेत. सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत राहील. ग्राहकांनी या नियमांचे पालन करून या वेळेत खरेदी करावी. ६५ वर्षांवरील व्यक्ती, १० वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिलांना प्रवेश मिळणार नाही. त्यांनी घरीच राहावे. प्रशासनाचे दिशानिर्देश आणि वेळ ३० जूनपर्यंत राहणार आहे. पुढे नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याचे रोकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर