शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश हवाय, घरमालकाचा भाडेकरार आणा; शिक्षण उपसंचालकांचा अफलातून आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:32 IST

ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेशात पालकांची गोचीयासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने भाडे करारनाम्याच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन दिले. प्रवेशासंदर्भात सत्यस्थिती उपसंचालकांपुढे ठेवली. ही अट रद्द करण्याच्या मागणी बरोबरच प्रवेशासाठीची मुदतवाढ देण्याची मागणी केली असल्याचे अध्यक्ष मो. शाहीद श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या भाडेकरू पालकांच्या पाल्याचा आरटीईत नंबर लागला आहे. त्यांना प्रवेश घेताना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा कागदपत्रांसोबत जोडायचा आहे. त्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे. मुळात अनेक भाड्याने राहणाऱ्या पालकांना नोंदणीकृत भाडेकरारनामा मिळणे शक्य नसल्याने, अशा पालकांची चांगलीच गोची होत आहे.आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लॉटरीच्या सोडतीनंतर विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश घेणे सुरू आहे. परंतु भाड्याने राहणाऱ्या पालकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या पत्रामुळे नोंदणीकृत भाडेकरारनामा नसलेल्या पालकांना शाळा प्रवेश देण्यास नकार देत आहे. त्यामुळे आरटीईत नंबर लागूनही प्रवेश मिळणार नाही अशी भिती पालकांना सतावत आहे. किरायाने राहणाºया ९० टक्के पालकांना अधिकृत भाडे करारनामा मिळविणे कठीण आहे. अधिकृत करारनाम्यासाठी घरमालकांची परवानगी गरजेची आहे. परंतु घरमालक त्यास नकार देत आहेत. पालक भाडे करारनामा करण्यासाठी पैसेही खर्च करण्यास तयार आहेत. पण घरमालकांचा नकार असल्याने ते हतबल झाले आहेत. पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांची गर्दी वाढली आहे.परंतु २३ मार्च २०१७ ला शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की, ज्या पालकांकडे आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, भाड्याची पावती यापैकी कोणताही एक पुरावा असेल तर प्रवेश द्यावा. जर पुरावा नसेल तर दुय्यम निबंधक कार्यालयातून अधिकृत भाडे करारनामा आवश्यक आहे. यावेळी मात्र दुय्यम निबंधक कार्यालयाचा अधिकृत भाडे करारनामा प्रवेशासाठी अधिकृत मानला गेल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र