शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

‘एक दिवस शिक्षकांचा’ एक आनंददायी सोहळा

By admin | Updated: September 5, 2015 03:08 IST

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने केवळ शिक्षकांसाठी मनोरंजन आणि विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन ...

लोकमत कॅम्पस क्लब : पेस आयआयटी मेडिकलचे आयोजन नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाच्या औचित्याने केवळ शिक्षकांसाठी मनोरंजन आणि विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन लोकमत कॅम्पस क्लब आणि पेस व आयआयटी व मेडिकलच्यावतीने एका हॉटेल मध्ये शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे शीर्षक ‘एक दिवस शिक्षकांचा’ असे होते. याप्रसंगी विनोद, विविध स्पर्धा, शिक्षकांचे कला सादरीकरण आणि शहरातील गायकांनी गीते सादर करुन शिक्षकांना आनंद दिला. शहरातील गायक सागर मधुमटकेने किशोरकुमार व मो. रफी यांची गीता सादर करुन शिक्षकांना आनंद दिला. ‘आ चल के तुझे मै ले के चलू.., ये श्याम मस्तानी...निले निले अंबर पे...’ आदी गीतांंनी यावेळी सागरने रंगत वाढविली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पेस आयआयटी मेडिकलचे संचालक अतुल यमसनवार, संचालक मुकेश मालविया, संचालक प्रदीप आठवले, अकॅडमीचे प्रमुख अनुराग वाजपेयी, हरिओम पुनियानी, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले यावेळी उपस्थित होते. अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले. याप्रसंगी पेस आयआयटीचे प्रेझेन्टेशन प्रोजेक्टरच्या साहाय्याने करण्यात आले. यावेळी मालविया यांनी हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना आयआयटी साठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सांस्कृतिक कार्यक्रमांसह वन मिनिट गेम शो, मनोरंजक प्रश्नोत्तरी, गीत संगीत, नृत्य, विनोद आदींचे आयोजन होते. या सर्व स्पर्धात आणि सादरीकरणात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. नृत्य स्पर्धेत शिक्षिका आघाडीवर होत्या. रंगारंग कार्यक्रमात शिक्षक हास्यविनोदात रंगले होते. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात शासनातर्फे २०१४-१५ चा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतच्या माला चिलबुले, भिडे गर्ल्स हायस्कूलच्या डॉ. मंगला गावंडे, नचिकेत अवॉर्डने सन्मानित अनुराग पांडे, सावित्रीबाई फुले अवॉर्ड प्राप्त हिदू मुलींच्या शाळेच्या सीमा फडणवीस यांना शाल, श्रीफळ व स्मतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची शाळा, हिंदू मुलींची शाळा, राजकुमार केवलरामानी हायस्कूल, दीनानाथ हायस्कूल, अभियांत्रिकी महाविद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, रविनाथ हायस्कूल, शिवनाथ हायस्कूल आदी शाळांच्या शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)