शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन प्रयोगशाळा नागपुरात

By admin | Updated: July 12, 2015 03:10 IST

केंद्र सरकारच्या विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळेसाठी धुटी येथे ४९.०४ हेक्टर जागा राज्य शासनाने मंजूर केली आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळेसाठी धुटी येथे ४९.०४ हेक्टर जागा राज्य शासनाने मंजूर केली आहे. एकूण ५०० कोटीचा हा प्रकल्प असून केंद्रीय ऊर्जामंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते या संस्थेच्या कामाचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाच्या अधिपत्याखालील संशोधन संस्थेने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळा नागपुरात स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपुरात जागेची मागणी केली होती. संस्थेने केलेल्या मागणीनुसार नागपूर ग्रामीण येथील धुटी येथे अनुक्रमे ३७.१९ हेक्टर, २.४३ हेक्टर आणि ९.४२ हेक्टर अशी एकूण ४९.०४ हेक्टर जागा शासनाने संस्थेसाठी मंजूर केली आहे. यासंबंधातील शासन निर्णय सुद्धा गेल्या २ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार धुटी येथील शासकीय जमीन नाममात्र १ रुपया दराने ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने नियमित अटी व शर्तीवर तसेच खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या केंद्र शासनाच्या स्वायत्त संस्थेस मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लागेल आणि ऊर्जा क्षेत्रात नवनवीन संशोधनाला सुरुवात होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय ट्रीपल आयटीसाठी वारंगा येथे ३९.९६ हेक्टर आणि नॅशनल लॉ स्कूलसाठी कारडोंगरी येथे २४.२९ हेक्टर जागा मंजूर करण्यात आली असल्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, गिरीश जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्याच्या जागेचा प्रश्न १५ दिवसात निकाली नागपुरातील अनेक पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत आहेत. ही पोलीस ठाणे स्वत:च्या जागेत उभी राहावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असून येत्या १५ दिवसात जागेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यासंबंधात शुक्रवारी नासुप्र अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली त्यात उपरोक्त विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापनगर, हुडकेश्वरसह शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या जागेच्या प्रश्नावर चर्चा झाली आहे. १५ दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल. मानकापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन येत्या १८ तारखेला करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील वाढलेली सीमा लक्षात घेता बेसा व बेलतरोडी हे नवीन पोलीस ठाणे तयार करणे आणि कामठी-बुटीबोरी व हिंगणा पोलीस ठाणे नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाशी जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखरर बावनकुळे यांनी सांगितले.