शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:50 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा सुरू झाली आहे. असे असूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मागील काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

ठळक मुद्देकारवाईचा परिणाम नाही : ठिकठिकाणी हटविलेल्या स्थळांचा मलबा पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा सुरू झाली आहे. असे असूनही महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. मागील काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.आता ठेले, दुकानांचा ताबामहापालिकेतर्फे कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दुकाने, ठेले व फे रीवाल्यांनी ताबा केला आहे. गांधीबाग, इतवारी, महाल, कमाल चौक, सदर यासह शहरातील विविध भागात अशी परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनानेही याला स्वीकृती दिली आहे. मात्र प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी अजूनही मलबा तसाच पडून आहे. याचा फायदा घेत अशा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. यातून अतिक्रमण करण्याला प्रोत्साहन मिळत आहे.अतिक्रमण वाढलेगांधीबाग येथील डागा रुग्णालय मार्गावरील चिंचेचे झाड असलेल्या चौकातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटिवण्यात आले होते. काही लोकांनी या कारवाईला विरोध केला होता. परंतु महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविले होते. परंतु येथे मलबा अजूनही पडून आहे. यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण पुन्हा निर्माण झाले आहे. येथे धार्मिक विधी पुन्हा सुरू झाल्या आहेत. आधीच्या तुलनेत अतिक्रमण वाढले आहे.अतिक्रमण हटविण्याचा उपयोग नाहीगांधीबाग उद्यानासमोरील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याला विरोध झाला होता. परंतु विरोधाला न जुमानता धार्मिक स्थळ हटविण्यात आले. परंतु मलबा अजूनही पडून आहे. नागरिकांनी पुन्हा पूजाअर्चा सुरू केली आहे. छिंदवाडा मार्गावरील पागलखाना चौका नजिकच्या फूटपाथवरील अनधिकृत  धार्मिक स्थळ हटविण्यात आले होते. ते पुन्हा उभारण्यात आले आहे. धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना ठिकठिकाणी अर्धवट बांधकाम तसेच आहे. यातील सळाकी बाहेर निघाल्या आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.मलबा उचलणारन्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. अतिक्रमण हटविलेल्या ठिकाणी दुकाने व फेरीवाल्यानी पुन्हा अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर कारवाई केली जात आहे. काही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण वाढले आहे. ते पुन्हा हटविण्यात येईल.अशोक पाटील, सहायक आयुक्त, प्रवर्तन विभाग मनपा

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेEnchroachmentअतिक्रमण