शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेडिकलच्या सहा एकर जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:29 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात आहे. मात्र, प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : वर्षानुवर्षे असलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात आहे. मात्र, प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.मेडिकल प्रशासनाला पहिल्यांदाच २११.६ एकर जमीन असल्याचा साक्षात्कार २०१६ मध्ये झाला. त्या आधारे जमिनीची प्राथमिक स्वरूपात मोजमाप करण्यात आले. यात साधारण सहा एकर जागेवर अतिक्रमण असल्याचे समोर आले. हे अतिक्रमण मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साधारण शंभरावर विविध खाद्यपदार्थांच्या हातठेल्यांचे, टीबी वॉर्डाच्या परिसरात मटन मार्केट व धोबीघाटाचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटललगत असलेल्या जागेवर व्यापारी संकुल असल्याचे समोर आले आहे.

 हातठेल्यांपासून ते धोबीघाटाचे अतिक्रमणमेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वारावर शंभरावर फळ, खाद्यपदार्थांच्या हातठेल्यांनी मोठी जागा व्यापली आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात येताना अडचणीचे जाते. अनेक वेळा चारचाकी वाहनांसाठी जागाही अपुरी पडते. रुग्णालयापासून काही अंतरावर असलेल्या मटन मार्केट व धोबीघाटानेही अतिक्रमण केले आहे. सूत्रानुसार, मेडिकल प्रशासनाने या अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित विभागाला माहिती दिली आहे, परंतु अद्यापही कारवाई नाही. या परिसरात झाले अतिक्रमण

  • मेडिकलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर शंभरच्यावर हातठेल्यांचे अतिक्रमण.
  • टीबी वॉर्डाच्या परिसरात मटन मार्केटचे अतिक्रमण
  • टीबी वॉर्डाच्या परिसरात धोबीघाटाचे अतिक्रमण
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटललगत व्यापारी संकुलाचे अतिक्रमण
टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयEnchroachmentअतिक्रमण