शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

मोठ्या प्लॉटवरील अतिक्रमण नियमित होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:48 IST

‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने वन विभाग वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आला. अतिक्रमणे नियमित करून भाडेपट्टा दिला जात आहे. मात्र यासाठीच्या सुधारित तरतुदीनुसार १५०० चौरस फुटाहून अधिक जागेवरील अतिक्रमण निष्काषित केल्याशिवाय अशी अतिक्रमणे नियमित केली जाणार नाही.

ठळक मुद्देरस्ता, गटारे व जलवाहीनीवर अतिक्रमण न काढल्यास भाडेपट्टा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने वन विभाग वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आला. अतिक्रमणे नियमित करून भाडेपट्टा दिला जात आहे. मात्र यासाठीच्या सुधारित तरतुदीनुसार १५०० चौरस फुटाहून अधिक जागेवरील अतिक्रमण निष्काषित केल्याशिवाय अशी अतिक्रमणे नियमित केली जाणार नाही.महापालिकेच्या जागावरील अतिक्रमण नियमित करताना अतिक्रमणधारकांनी रस्ता, गटारे, जलवाहिनी अशा आवश्यक सुविधांच्या क्षेत्रात केलेले अतिक्रमण कोणत्याही मोबदल्याशिवाय महापालिकेकडे हस्तांतरित करावयाचे आहे. याबाबतची लेख हमी दिल्यानंतरच संबंधितांचे उर्वरित अतिक्रमण नियमित के ले जाईल. भाडेपट्ट्यासाठी सुधारित भाडेपट्टा करारनामा तयार करण्यात आला. याबाबतचे प्रारूप २० जूनला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.भाडेपट्टाधारकास एक रुपये प्रति चौरस फूट दराने वार्षिक भाडे महापालिकेकडे जमा करावे लागणार आहे. ही रक्कम दरवर्षी विहित मुदतीत महापालिकेडे जमा न केल्यास भाडेपट्टा रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाला राहतील. भाडेपट्टाधारकाने नियमाचे उल्लंघन केल्यास भाडेपट्टा रद्द केला केला जाईल.प्रतिनियुक्तीचा मुद्दा गाजणारमहापालिकेच्या लेखा विभागात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा मुद्दा माजी महापौर प्रवीण दटके यांनी नोटीसद्वारे उपस्थित केला आहे. मनपाच्या आस्थापनेनुसार किती पदे आहेत. तसेच प्रतिनियुक्तिी व्यतिरिक्त शासनाचे किती सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांची नियुक्ती शासन निर्णयाला आधीन राहून करण्यात आलेली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. वित्त विभागात प्रतिनियुक्तीवरील काही अधिकाऱ्यांकडे जबाबदारी नसल्याने महापालिकेवर आर्थिक बोजा पडत आहे. यावर सभागृहात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील सभागृहातही हा मुद्दा गाजला होता.सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न ऐरणीवरमहापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता प्रशासनाने यावर अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. नगरसेवक या मुद्यावरून सभाग्हात चर्चेची मागणी करण्याच्या विचारात आहे. यावर पदाधिकारी कोणती भूमिका घेतात. याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण