शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एम्प्रेस मॉलकडे मनपाचे ४७.०३ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:35 IST

महापालिके च्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या यादीत के.एस.एल.अ‍ॅन्ड इंडस्ट्रीच लिमिटेड (केएसएल) चा गांधीसागर येथील एम्प्रेस मॉल व निवासी परिसर अग्रस्थानी आहे. विविध प्रकारचे कर व अवैध बांधकाम प्रकरणात महापालिका प्रशासनाने एम्प्रेस मॉलवर आजवर ४७ कोटी ३ लाख ९८ हजार ३९८ कोटींची थकबाकी आहे. दोन बँकांचे कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने मंगळवारी ईडीने कारवाई केली. त्यानंतर एम्पेस मॉल चर्चेत आला. महापालिका मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कोणती कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमोठ्या थकबाकीदारांच्या यादीत अग्रक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिके च्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या यादीत के.एस.एल.अ‍ॅन्ड इंडस्ट्रीच लिमिटेड (केएसएल) चा गांधीसागर येथील एम्प्रेस मॉल व निवासी परिसर अग्रस्थानी आहे. विविध प्रकारचे कर व अवैध बांधकाम प्रकरणात महापालिका प्रशासनाने एम्प्रेस मॉलवर आजवर ४७ कोटी ३ लाख ९८ हजार ३९८ कोटींची थकबाकी आहे. दोन बँकांचे कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याने मंगळवारी ईडीने कारवाई केली. त्यानंतर एम्पेस मॉल चर्चेत आला. महापालिका मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कोणती कारवाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने जेव्हाही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा केएसएल गु्रपने याला न्यायालयात आव्हान दिले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने महापालिके ला थकबाकी वसुलीची कारवाई करता आलेली नाही. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार एम्प्रेस मॉलकडे मालमत्ता कराची २२.५४ कोटींची थक बाकी आहे. यात व्यावसायिक मालमत्तेवर २२.१० कोटी व निवासी इमारतीवर ४४.४५ लाखांचा कर थकीत आहे. जलप्रदाय विभागाचीही ४.३७ कोटींची थकबाकी आहे. पाणीपट्टी न भरल्याने वर्ष २०१४ मध्ये पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. तेव्हापासून एम्प्रेस मॉल भूगर्भातील बोरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहे. याचा विचार करता मालमत्ता कर विभागाने एम्प्रेस मॉल प्रशासनावर मालमत्ता करात पाणीपट्टी जोडून ५२.५० कोटींचे बील पाठविले आहे.अवैध बांधकामासंदर्भात महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने अनेकदा एम्प्रेस मॉलवर कारवाई केली आहे. माजी महापौर प्रवीण दटके यांनी कागदपत्रासह महापालिका सभागृहात हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. त्यानंतर नगररचना विभागाने अवैध बांधकामाची स्वतंत्र चौकशी करून एकूण १९.०२ कोटींचा कर मॉल प्रशासनावर काढला. जाहीरात विभागानेही ५६.२५ लाखांची थकबाकी काढली. जेव्हापासून केएसएल समुहाने एम्प्रेस मॉलचे बांधकाम सुरू केले तेव्हापासूनच कर आकारण्याच्या मुद्यावरून महापालिका व समुहात वाद सुरू आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmpress Mallएम्प्रेस मॉल