शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारावर तरुणांना रोजगार

By admin | Updated: March 28, 2017 01:50 IST

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला.

पुढच्या वर्षी पाच हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प : हजारो तरुण-तरुणींनी घेतला लाभ नागपूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. या रोजगार मेळाव्याला नागपूरसह विदर्भातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. हजारो तरुण-तरुणींनी आपली नोंदणी केली. मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या तीन दिवसात जवळपास तीन हजारावर तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यात हा मेळावा यशस्वी ठरला. पुढच्या वर्षी यापेक्षाही अधिक जोमाने आणि सर्वांच्या सहकार्याने याच मेळाव्यात पाच हजार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष व मेळाव्याचे संयोजक आ. अनिल सोले यांनी केला. फॉर्च्युन फाऊंडेशन, इंजिनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे वसंतराव देशपांडे सभागृह व परिसरात तीन दिवसीय यूथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आले होते. कौशल्य विकास विभाग मिहान, क्रीडा, युवक कल्याण व सांस्कृतिक विभाग, उद्योग विभाग, सामाजिक न्याय विभाग, वन व पर्यटन विभाग, नेहरू युवा केंद्र, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, दीनदयाल कौशल्य योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका मनपा, प्रमोद महाजन कौशल्य योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅण्ड टे्रनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने तीन दिवसाच्या या रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरींच्या संधी आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळाले. मुद्रा लोनची माहिती मिळाली. केवळ माहिती व मार्गदर्शनच नव्हे तर अनेकांना प्रत्यक्षात नोकरीही मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन तर युवकांना एक नवीन ऊर्जा देऊन गेले. (प्रतिनिधी)