शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो तरुणांना रोजगार मिळणार; १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार, फडणवीसांची मोठी घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 12:53 IST

रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ, असं फडणवीस म्हणाले.

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरभरतीसंबधात महत्वाची घोषणा केली आहे. राज्यात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. त्या अंतर्गत, येत्या आठवड्यात १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवत असलेल्या रोजगार योजनेचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यभरातल्या तरुणांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र देणार, अशी घोषण फडणवीस यांनी केली. तसेच, सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे. राज्यातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात रोजगार योजना राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडाभरात १८ हजार पोलीस भरतीची जाहीरातदेखील काढण्यात येईल. यासह सगळ्या विभागांच्या जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे. या व्यतिरिक्त रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही उपलब्ध करून देऊ, असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :jobनोकरीPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment jobs updateसरकारी नोकरी