शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेषच : सरकारची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 20:52 IST

राज्यातील सहा महसुली विभागांपैकी नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेष आहे. कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे.

ठळक मुद्देबेरोजगारी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी झालेल्या नागपूर करारातील तरतुदींचे पालन करण्यात येत नसल्याची बाब शासनानेच कबुली दिली आहे. राज्यातील सहा महसुली विभागांपैकी नागपूर व कोकण विभागात रोजगाराचा अनुशेष आहे. कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. तर नागपूर विभागात स्पर्धा परीक्षांद्वारे शिफारसप्राप्त उमेदवारांचे प्रमाण कमी असल्याची बाब विधान परिषदेतील सभागृह नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.ख्वाजा बेग यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. १९५३ साली झालेल्या नागपूर करारातील तरतुदींनुसार शासनाकडील तसे शासन नियंत्रित उपक्रमांमधील सर्व श्रेणीतील नोकरभरतीच्या वेळी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावे, असे स्पष्ट होते. या तरतुदींनुसार विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र या विभागांना नोकरभरतीत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व प्राप्त झाले की नाही, याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित झाली होती. उपसमितीला आढळून आलेल्या बाबींनुसार सहा महसूल विभागांपैकी कोकण विभागात शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या अनुषंगाने कमी आहे. तर नागपूर व कोकण विभागातील शिफारसप्राप्त उमेदवारांचे प्रमाण त्या विभागांतील लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे. या दोन्ही विभागांतील उमेदवार शासकीय सेवेत कमी येत असल्याने, तेथील उमेदवारांना आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने योजना तयार करावी, अशी शिफारस उपसमितीने केली होती. यासंदर्भात पावले उचलण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले असल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित उत्तर योग्य नसून सर्वच बाबतीत नागपूर विभागात अनुशेष असल्याचा मुद्दा जोगेंद्र कवाडे यांनी मांडला. यावर बोलत असताना देसाई यांनी बेरोजगारी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईUnemploymentबेरोजगारीVidhan Parishadविधान परिषद