शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्फिडन्स पेट्रोलियममध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 22:49 IST

Employee Committed Suicide in Factory कळमेश्वर शहरालगतच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया प्रा. लि. नामक कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : शहरालगतच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया प्रा. लि. नामक कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. १२) दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.अमित नंदकुमार कवडे (३९, रा. येळाकेळी, ता. सेलू, जिल्हा वर्धा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. अमित काही वर्षांपासून या कंपनीत नोकरी करायचे. ते कळमेश्वर शहरातील वॉर्ड क्रमांक-१४ मध्ये कुटुंबीयांसह राहायचे. या कंपनीमध्ये घरगुती वापराच्या स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचे उत्पादन केले जाते. ते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर केले. त्यातच त्यांनी कंपनीच्या स्टोअर रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अमित यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यांच्या आत्महत्येला कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप वडील नंदकुमार यांनी केला आहे. मात्र, पोलीस दप्तरी या आरोपाची नोंद नाही.कंपनीने लॉकडाऊन काळातही कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले आहे. अमितलाही नियमित वेतन सुरू होते. ते शांत स्वभावाचे व प्रामाणिक कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याची चौकशी करण्याच्या सूचना कंपनीच्या कार्मिक व्यवस्थापकांना दिल्या आहेत.शुभांक सिंग, कंपनी एक्झिक्युटिव्ह,कॉन्फिडन्स ग्रुप.या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्रकरण तपासात घेतले आहे. या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी केली जाईल. त्यात कुणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.मारुती मुळूक,ठाणेदार, कळमेश्वर पोलीस ठाणे.

टॅग्स :Suicideआत्महत्याEmployeeकर्मचारी