शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:44 IST

शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उपाध्याय यांनी केले.

ठळक मुद्दे‘मेक इन इंडिया’ पहिले संमेलन व ग्राहक-विक्रेता बैठकविदर्भातील लघु व मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाचे पाऊलविदर्भासोबत पोहोचले देश-विदेशातील शस्त्र उत्पादक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उपाध्याय यांनी केले.गुरुवारी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीयल असोसिएशन, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदा ‘मेक इन इंडिया’ संमेलन व ग्राहक-विक्रेता बैठकीचे आयोजन करण्यात आले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित संमेलनाचे उद्घाटन ले. जनरल उपाध्याय यांनी केले. यावेळी ले. जनरल संजय वर्मा, असोसिएशनचे अध्यक्ष ले. जनरल (निवृत्त) रवींद्र थोदगे, सत्यनारायण नुवाल, एअर मार्शल शिरीष देव, वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयाचे एव्हीएम श्रीरंग चावजी, संजय सोम, कर्नल (निवृत्त) आर. एस. भाटिया व भारतातील स्लोव्हाकियाचे माजी राजदूत एच. ई. जिंगमुड बरटोक उपस्थित होते. ले. जनरल उपाध्याय म्हणाले, स्वदेशी शस्त्र उत्पादक कंपन्यांना चालना देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. सोबतच शीघ्र प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे विदर्भासह देशातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळू शकेल. उद्घाटन समारंभानंतर विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. पहिले सत्र शस्त्र उत्पादनात खासगी व सार्वजनिक सहायक क्षेत्राच्या रूपाने संधी या विषयावर आयोजित करण्यात आले. दुसरे सत्र अपॉर्च्युनिटी स्पेक्ट्रम व तिसरे सत्र भारतीय सैन्याची गरज या विषयावर आयोजित करण्यात आले. या सत्रात शस्त्र उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.शस्त्र उत्पादनाशी निगडित प्रदर्शनसंमेलनात शस्त्र उत्पादनाची आवश्यकतेशी निगडित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात सीडोडी जबलपूर, वायुसेना अनुरक्षण कमान मुख्यालय, सीएडीडब्ल्यूएफ शिवाय विविध शस्त्र उत्पादनाशी निगडित कंपन्यांनी सहभाग घेतला. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेले उत्पादक व कंपनीच्या प्रतिनिधींना प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरक्षा क्षेत्राच्या गरजांची माहिती देण्यात आली.

 

टॅग्स :ORDNANCE FACTORY AMBAJHARIआयुध निर्माणी अंबाझरीnagpurनागपूर