शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल वसुलीवर भर, सेवेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरण सध्या वीजज बिल वसुलीवर सर्वाधिक भर देत आहे. परंतु ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करणे हे सुद्धा महावितरणचे काम आहे. बुधवारी शहरातील हजारो नागरिकांना कडाक्याच्या उन्हाळ्यात रात्र अंधारात काढावी लागली. सायंकाळी गेलेली वीज दुसऱ्या दिवशीपर्यंत आलीच नाही. परिणामी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे थकबाकीची वसुली करा, पण सेवेचे काय असा प्रश्न नागरिकांकडून महावितरणला विचारला जात आहे.

सध्या कडक उन्ह तापू लागले आहे. कुलरही सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत वीज गेली तर काय होईल, याची कल्पना सर्वांनाच आहे. बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास असाच प्रकार घडला. हिवरीनगर, पडोळेनगर परिसरातील वीज अचानक गेली. बराच वेळ वाट पाहूनही वीज न आल्याने लोक घराबाहेर निघाले. काही लोकांनी वीज कार्यालयात फोन केला. तेव्हा ट्रान्सफाॅर्मर बिघडल्याचे सांगण्यात आले. काहींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु काहीच फायदा झाला नाही. रात्री गेलेली वीज गुरुवारी सकाळी ११ वाजता काही वेळेसाठी आली आणि पुन्हा गेली. ती बराच वेळ आलीच नाही. य ट्रान्सफाॅर्मरच्या बिघाडामुळे केवळ हिवरीनगर व पडोळेनगरच नव्हे तर न्यू पँथरनगर, लोकजीवननगर, चांदमारी, संघर्षनगर, महाल आदी परिसरातील हजारो लोकांना रात्र अंधारात काढावी लागली.

अलीकडे महावितरण ज्या गतीने थकबाकी वसुली मोहीम राबवित आहे. तशीच तत्परसेवासुद्धा लोकांना उपलब्ध का केली जात नाही, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी केला.

- हा त्रास नेहमीचाच

या परिसरातील नागरिक आणि माजी नगरसेवक असलेले यशवंत मेश्राम यांनी सांगितले की, वीज गेली की ती तासन‌्तास येतच नाही. ही या परिसरातील रोजचीच बाब झाली आहे. ट्रान्सफाॅर्मरची नियमित देखभाल होत नसल्याने हे प्रकार होत आहे. बुधवारी लाईट गेली तेव्हा मी स्वत: वाठोडा स्टेशनचे इंचार्ज यांना सूचना दिली. परंतु काहीच झाले नाही. नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. असाच प्रकार सुरू राहिला तर नागरिकांचा असंतोष उफाळून आल्याशिवाय राहणार नाही.