शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या ६४,२७३ रुग्णांना तातडीची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोविडच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहचवून त्यांचे प्राण वाचविण्यामध्ये ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा हातभार लागत आहे. नागपूर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोविडच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहचवून त्यांचे प्राण वाचविण्यामध्ये ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा हातभार लागत आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा व गडचिरोली या सहा जिल्ह्यातील कोरोनाशी संबंधित ६४,२७३ रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रुग्णसेवा देत असताना रुग्णवाहिकेतील १२ डॉक्टर व २३ चालक पॉझिटिव्ह आले होते. शिवाय, रुग्णांच्या संपर्कात आलेले १३० डॉक्टर व चालकांना होम क्वारंटाईन व्हावे लागले. कोरोनाशी लढा देत हे डॉक्टर व परिचारिका पुन्हा कामावर परतले असून, हे खरे ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ची ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यात जवळपास ९३७ रुग्णवाहिका आहेत. यात २३३ ‘अ‍ॅडव्हान्सड् लाईफ सपोर्ट(एएलएस) तर ४०७ ‘बेसिक लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स (बीएलएस) आहेत. नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून ११० रुग्णवाहिका आहेत. यात ‘एएलएस’ २७ तर ‘बीएलएस’ ८३ आहेत. यांच्या सेवेत २९७ डॉक्टर कार्यरत आहेत.

- नागपूर जिल्ह्यातील १२,५५१ रुग्णांना मदत

नागपूर जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका आहेत. यात ‘एएलएस’ ९ तर ‘बीएलएस’ ३१ आहेत. मार्च ते नोव्हेंबर या नऊ महिन्याच्या काळात कोविडबाधितांसह संशयित १२,५५१ रुग्णांना सेवा देण्यात आली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक २९,६६६ रुग्णांना रुग्णवाहिकेची मदत झाली. या जिल्ह्यात ‘एएलएस’ ७ तर ‘बीएलएस’ १६ आहेत. भंडारा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिकेच्या मदतीने ४,६९७ रुग्णांना, गडचिरोली जिल्ह्यात १० रुग्णवाहिकेच्या मदतीने १,१६२ रुग्णांना, गोंदिया जिल्ह्यात १५ रुग्णवाहिकेच्या मदतीने ९,०७८ रुग्णांना तर वर्धा जिल्ह्यात ११ रुग्णवाहिकेच्या मदतीने ७,११९ रुग्णांना सेवा देण्यात आली.

- १२ डॉक्टर, २३ चालक पॉझिटिव्ह

रुग्णवाहिकेतील कोरोनाबाधितांना तातडीने ऑक्सिजन लावण्यापासून ते आवश्यक औषधोपचार करणारे आतापर्यंत १२ डॉक्टर व २३ चालक पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय जिल्हा व्यवस्थापक, सुपरवायझरही यातून सुटले नाही. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले ५२ डॉक्टर व ७८ चालकांना होम आयसोलेशनची गरज पडली होती. या सर्व समस्यांना तोंड देत १०८ ची सेवा निरंतर सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे ऑपरेशन हेड, दीपककुमार उके यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.

- डॉक्टर्स, चालक २४ तास रुग्णसेवेत

कोविड रुग्णांच्या सेवेत १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालक २४ तास रुग्णसेवा देतात. यांना कोविडचे रुग्ण हाताळण्यासोबतच पीपीई किट घालण्याचे व काढण्याचे प्रशिक्षण प्राप्त आहे. त्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

- दीपककुमार उके

ऑपरेशन हेड, ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’

- जिल्हानिहाय रुग्णवाहिकेतून रुग्णसेवा

जिल्हारुग्ण

नागपूर१२,५५१

भंडारा४,६९७

चंद्रपूर२९,६६६

गडचिरोली१,१६२

गोंदिया ९,०७८

वर्धा ७,११९