शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या उपचारासाठी नागपुरात विमानाची इमर्जन्सी लँडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:18 IST

विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली.

ठळक मुद्देप्रवासातच आला होता अस्थमाचा अटॅक : उपचारानंतर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली.मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील रहिवासी झाशी राणी जवाहर ही ३२ वर्षीय महिला तिचे वडील अनू जनल्यू जवाहर यांच्यासमावेत बनारसला मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. ही महिला किडनीच्या आजाराने पीडित असून डायलिसिसही सुरू आहे. याशिवाय त्यांना अस्थमाचाही त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. बनारसमध्ये दर्शनानंतर इंडिगोच्या ६ ई- ९१६ या वाराणसी-हैदराबाद फ्लाईटने ते सकाळी ८.५० वाजता परतीच्या प्रवासासाठी निघाले. हे विमान उडाण घेतल्याच्या तासाभरानंतर झाशी राणी यांना अस्थमाचा अटॅक आला. वडिलांनी विमानाच्या चालक दलाकडे आकस्मिक सेवेची विनंती केली. चालक दलाने त्यामुळे नागपूर एटीसीकडे विमानतळावर आकस्मिक लँडिंगसाठी परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर सकाळी १०.०४ वाजता विमान नागपूरच्या विमानतळावर थांबले. त्यानंतर प्रवासी रुग्ण महिलेला विमानतळावर उपस्थित डॉक्टरांद्वारे तपासण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली. पाऊण तासाच्या या प्रक्रियेनंतर सकाळी ११ वाजता विमान हैदराबादकडे रवाना झाले.रुग्ण महिलेला रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचाराने स्थिती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीने ही महिला सायंकाळी ५ वाजता इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली. वेळेवर उपचार मिळाल्याने या महिलेचे प्राण वाचू शकले. विशेष म्हणजे यापूर्वी सोमवारी अशाचप्रकारे महिलेची प्रकृती बिघडल्याने विमानाची आकस्मिक लँडिंग करावी लागली होती, मात्र या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास नागपूर विमानतळाच्या सर्व एजन्सी तत्परतेने प्रतिक्रिया देत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरIndigoइंडिगो