शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एअर प्रेशरमुळे विमानाचे नागपुरात इमरजन्सी लॅण्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 22:21 IST

बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांनी तिकीट परत केले आणि दुसऱ्या एअरलाईनच्या विमानाने रवाना झाले.

ठळक मुद्देप्रवाशांना उपलब्ध करून दिले विशेष विमान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांनी तिकीट परत केले आणि दुसऱ्या एअरलाईनच्या विमानाने रवाना झाले.गो-एअरच्या जी८-७००१ बेंगळुरु-दिल्ली या विमानात अचानक एअर प्रेशरचा प्रॉब्लेम आला होता. प्रवासी प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ अनुभवत होते. प्रवाशांना त्रास होत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ जवळच्या विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेतला व नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे इमरजन्सी लॅण्डींग करण्याची अनुमती मागितली. दुपारी २.५० वाजता विमानाला सुरक्षित लॅण्ड करण्यात आले. दरम्यान रनवेच्या जवळ कुठलीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून फायर टेंडर सह इमरजन्सी लॅण्डींगसाठी आवश्यक तरतुदी तयार ठेवण्यात आल्या होत्या. लॅण्डींगनगर विमानाची शुक्रवारी रात्रीपर्यंत तपासणी सुरू होती. मात्र प्रवाशांना बराच काळ थांबावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. विमान कंपनीने रात्री एका प्लाईटचे रिफंड पर्याय शोधला. प्रवाशांनीही त्याला मान्यता दिली. त्यानंतर ९.१० वाजता विमान दिल्लीकडे रवाना झाले. काही प्रवासी इंडिगोने रवाना झाले.दुसरे विमान बोलविले होतेगो-एअरची २६ एप्रिलपासून तीन नवीन उड्डाणे सुरू झाली आहे. यात रात्री ९.२५ ला जी८-२५२० नागपूर-दिल्ली विमान आहे. त्यामुळे या उड्डाणासाठी विमानतळावर पूर्वीपासूनच विमान होते. इमरजन्सी लॅण्डींगनंतर त्याला विशेष प्लाईटचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे ९.२५ च्या नागपूर -दिल्ली फ्लाईटसाठी दुसरे विमान बोलविण्यात आले होते. विशेष म्हणजे गो-एअर नवीन विमानांमध्ये जी८-२१५५ सकाळी ९.१० वाजता दिल्लीसाठी, जी८ २५२० रात्री २१.५५ वाजता दिल्लीसाठी व सकाळी ८.५० वाजता जी८ २६०२ मुंबईसाठी आहे.

टॅग्स :GoAirगो-एअरDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर