शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हायकोर्ट इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल, सुरक्षायंत्रणांची धावपळ

By योगेश पांडे | Updated: April 22, 2025 16:20 IST

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठालादेखील असाच ई-मेल मिळाला

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत मंगळवारी दुपारच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्यामुळे खळबळ उडाली. या ई-मेलनंतर बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची धावपळ उडाली. सखोल शोधमोहीमेनंतर काहीच न सापडल्याने तो ई-मेल अफवाच असल्याचे स्पष्ट झाले व सुरक्षायंत्रणांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला. याची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने तेथे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. इमारतीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. अडीच ते तीन तास इमारतीचा कानाकोपरा तपासल्यावर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित ई-मेल नेमका कुणी केला याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. २४ मार्च रोजी जरीपटका येथील एका व्यक्तीने अशाच पद्धतीचा फोन करून सुरक्षायंत्रणांना कामाला लावले होते. विरोधात निकाल लागल्यामुळे त्याने हे कृत्य केले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठालादेखील असाच ई-मेल मिळाला. तीदेखील अफवाच असल्याची बाब समोर आली.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय