लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. सोमवारी फूटपाथवरील तब्बल ५६० अतिक्रमणांचा सफाया केला. आठ ते दहा ट्रक साहित्य जप्त केले. काही भागात विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात राबवून दंडही वसूल केला
.
लक्ष्मीनगर झोन : माटे चौक ते आयटी पार्क ते हिंगणा टी पाॅईंट ते मंगलमूर्ती चौक ते जयताळा रोड या मार्गावरील ७५ अतिक्रमणे हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त करून ६५०० रुपये दंड वसूल केला.
धरमपेठ झोन - रवीनगर चौक, अमरावती रोडवरील ३४ अतिक्रमणे हटविली. शंकरनगर चौक, बजाजनगर चौकदरम्यान ४२ अतिक्रमणे हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त केले.
धंंतोली झोन : गांधी सागर तलाव ते गणेश पेठ बसस्थानक, अशोक चौक ते मेडिकल चौक, तुकडोजी चौक ते अजनी पोलीस स्टेशन, रामेश्वरी रोड या भागातील ७५ अतिक्रमणे हटविली.
नेहरूनगर झोन : खरबी चौक ते वाठोडा घाट, गिड्डबा मंदिर या मार्गावरील फूटपाथवरील ५५ अतिक्रमणे हटवून २ ट्रक साहित्य जप्त केले.
गांधीबाग झोन : दारस्कर रोड ते सिटी पोस्ट ऑफिस, कारण कोठारी रोड येथील ६६ अतिक्रमणे काढली.
लकडगंज झोन : दानागंज चौक ते वर्धमाननगर चौकदरम्यानची ६९ अतिक्रमणे काढण्यात आली. एक साहित्य जप्त केले.
आशीनगर झोन : इंदोरा चौक ते कमाल चौक, आवळेबाबू चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. पथकाने ७० अतिक्रमणे हटविली.
मंगळवारी झोन : कस्तुरचंद पार्क परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. या परिसरातील ७५ अतिक्रमणे हटविण्यात आली.