शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

१२७० अतिक्रमणांचा सफाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST

मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम : शहरातील फुटपाथ मोकळे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सोमवारी शहरातील ...

मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम : शहरातील फुटपाथ मोकळे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सोमवारी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी शहराच्या विविध भागातील फुटपाथवरील तब्बल १२७० अतिक्रमणांचा सफाया केला. काही भागातील विरोधाला न जुमानता आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार सर्व झोनमध्ये ही मोहीम धडाक्यात राबविण्यात आली. मंगळवारीही मोहीम सुरू राहणार आहे.

लक्ष्मीनगर झोन : लक्ष्मीभवन चौक ते आठरस्ता चौक ते पोलीस प्रशिक्षण चौक ते साई मंदिर वर्धा रोड ते अजनी चौक, देवनगर ते छत्रपती चौक ते खामला चौक ते परत पोलीस प्रशिक्षण केंद्र या मार्गावरील १५८ अतिक्रमणे हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त केले.

धरमपेठ झोन : युनिव्हर्सिटी लायब्ररी चौक ते सराफा बाजार चौक दरम्यानच्या फुटपावरील अतिक्रमण हटविले. त्यानतंर गोकुळपेठ बाजार परिसरातील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. तसेच गोकुळपेठ ते शंकरनगर मार्गावरील अतिक्रमण हटविले. अशाप्रकारे १७० अतिक्रमणे हटविण्यात आली.

हनुमाननगर झोन : तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, मानेवाडा चौक ते म्हाळगीनगर चौक ते हुडकेश्वर मेन रोड ते शारदा चौक दरम्यानच्या रस्त्यालगतचे फुटपाथ मोकळे करण्यात आले. या झोनमधील १७० अतिक्रमणे हटविण्यात आली.

धंंतोली झोन : रामेश्वरी रोड ते सुभाषनगर ते वंजारीनगर ते तुकडोजी पुतळा येथील फुटपाथ परिसर पूर्णपणे खाली करण्यात आले. झोनच्या पथकांनी १६० अतिक्रमणे हटविली.

नेहरूनगर झोन : या झोनमधील बॉलिवूड सेन्टर पॉइंट ते म्हाळगीनगर चौक दरम्यानच्या फुटपाथवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. कारवाईत १४२ अतिक्रमणे हटविण्यात आली.

गांधीबाग झोन : मोमिनपुरा कब्रस्तान रोडच्या फुटपाथवरील १२ अतिक्रमणे हटविण्यात आली. टिनाचे शेड तसेच दुकानांचे बांधकाम तोडले. चार घरासमोरील छत तोडण्यात आले. मोमिनपुरा ते सोखता भवन, बडकस चौक ते महाल कोतवाली, गांधीबाग परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. या झोनमधील १४२ अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला.

लकडगंज झोन : एच.बी. टाऊन परिसरातील फुटपाथ मोकळे करण्यात आले. या परिसरातील ३४ अतिक्रमणे हटविण्यात आली.

आशीनगर झोन : इंदोरा चौक ते कमाल चौक, आवळेबाबू चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले. पथकाने १६५ अतिक्रमणे हटविली.

मंगळवारी झोन : पोलीस तलाव ते सीआयडी ऑफिस, आनंद नगर, पेन्शन नगर यासह अन्य भागातील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. या झोनमधील १४३ अतिक्रमणे हटविण्यात आली.