शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

अकरावीचे रंगारंग प्रवेश !

By admin | Updated: May 28, 2014 01:10 IST

‘सीबीएसई’ दहावीच्या निकालानंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये अकरावी

विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता : निकाल लागल्यानंतर सुरू होणार प्रक्रिया

नागपूर : ‘सीबीएसई’ दहावीच्या निकालानंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशाची अगोदरपासूनच उत्सुकता दिसून येत आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा अर्जांमधील रंगाची संख्यादेखील वाढली आहे. एकूणच यंदाची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश समितीची परीक्षा पाहणारी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. शहरातील १७० कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान, द्विलक्षी, कला व वाणिज्य शाखांतील ३९ हजार ७८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत द्विलक्षी व विज्ञान शाखांचे प्रवेश या प्रक्रियेतून झाले. त्यामुळे शाखानिहाय रंगीत अर्जांची संख्या मर्यादित होती. परंतु यंदा शाखा वाढल्या आहेत. त्यामुळे शाखा व माध्यमनिहाय निरनिराळ्या रंगांचे प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने प्रवेश प्रक्रिया रंगारंग स्वरूपाची होणार आहे. कुठल्या शाखेसाठी व माध्यमासाठी नेमका कोणत्या रंगाचा अर्ज देण्यात येईल, हे ठरविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली. राज्य मंडळाचे दहावीचे निकाल जाहीर झाले की लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) समितीची परीक्षा इतक्या मोठ्या प्रमाणावर जागांची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे केंद्रीय प्रवेश समितीसमोर आव्हानच आहे. मागील वर्षी केवळ विज्ञान व द्विलक्षीसाठी ही प्रक्रिया असतानादेखील पालक व विद्यार्थ्यांकडून काही ठिकाणांहून नाराजीचा सूर आला होता. यंदा तर वाणिज्य व कला शाखेचादेखील यात समावेश झाल्याने समितीची जबाबदारी आणखी वाढली आहे. संपूर्ण प्रक्रियेचे योग्य नियोजन करण्यात आले असून, विद्यार्थी हितालाच सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन डॉ.पटवे यांनी दिले.