शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वीज न पोहोचलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:53 IST

राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार ४० हजार ९५९ गावांचे विद्युतीकरण झाले असून पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या १११ गावांचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.आमदार शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.मंत्री बावनकुळे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील ६६ तर नंदुरबार जिल्ह्यातील ३४ गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ३४ पैकी ३३ गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील ७ तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा १११ गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. यापैकी ५४ गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर ५७ गावांचे विद्युतीकरण हे महाऊर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर महावितरण कंपनीमार्फत ५४ पैकी १४ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून महाऊर्जाद्वारे ५७ पैकी २८ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ट्रान्सफॉर्मरसदस्य सुनील केदार यांनी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोरच ट्रान्सफॉर्मर असून त्यांच्या घराला तेथून वीज मिळत असल्याचा आरोप केला. दरम्यान ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आपल्या घरासमोर कुठलेही ट्रान्सफॉर्मर नसल्याचे स्पष्ट करीत हा आरोप खोडून काढला.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे